Shubman Gill : आधी सारा आता रश्मिका? शुभमन गिलच्या नव्या अफेअरच्या चर्चांना उधाण

Shubman Gill - rashmika mandanna
Shubman Gill - rashmika mandanna

नवी दिल्ली - भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल केवळ क्रिकेटच्या मैदानावरील त्याच्या खेळासाठीच नाही तर मैदानाबाहेरील त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असतो. याआधी शुभमन गिल अभिनेत्री सारा अली खानला डेट करत असल्याच्या बातम्या येत असतानाच आता त्याचे नाव साऊथ फिल्म स्टार अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत जोडले जात आहे.

Shubman Gill - rashmika mandanna
Manish Sisodia: सिसोदियांच्या ट्विटनं उडाली खळबळं! भाजपचं आकांडतांडव

खरं तर, इंस्टाबॉलीवूड नावाच्या एका इंस्टाग्राम पेजने शुभमन गिल आणि रश्मिका मंदना यांचा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यात दावा केला आहे की गिलने एका मुलाखतीदरम्यान कबूल केले की त्याचं पहिलं क्रश रश्मिका मंदाना होती. त्याचवेळी गिलने दिलेले उत्तर सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

शुभमन गिलने या पोस्टला उत्तर देताना लिहिले की, मी कोणत्या मीडिया संवादात हे बोललो, ज्याबद्दल मला स्वतःला माहिती नाही. मात्र, या पोस्टवर अभिनेत्री रश्मिका मंदानाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Shubman Gill - rashmika mandanna
Budget 2023 : विरोधक त्यांच्या काळात संधीची माती करतात; सुधीर मुनगंटीवारांची टीका

भारतीय संघ सध्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना खेळत आहे, शुभमन गिल देखील या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा एक भाग आहे. या कसोटी मालिकेतील पहिल्या 2 कसोटी सामन्यांमध्ये गिलला खेळण्याची संधी मिळाली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com