Shubman Gill : सर्वांची तोंडे केली बंद! सचिनच्या उपस्थितीत शुभमनने अर्धशतक नाही ठोकले थेट 'विक्रमी' शतक

Shubman Gill T20 Century IND vs NZ 3rd T20
Shubman Gill T20 Century IND vs NZ 3rd T20ESAKAL

Shubman Gill T20 Century IND vs NZ 3rd T20 : वनडे क्रिकेटमध्ये नुकताच द्विशतकी धमाका करणाऱ्या गिलच्या टी 20 कारकिर्दिची सुरूवात खास झाली नव्हती. मात्र न्यूझीलंडविरूद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात गिलने तडाखेबाज शतकी खेळी केली. आपला 7 वा टी 20 सामना खेळणाऱ्या शुभमन गिलने यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर एकही आर्धशतकी खेळी केली नव्हती. मात्र त्याने न्यूझीलंडविरूद्धच्या तिसऱ्या आणि मालिकेत्या दृष्टीकोणातून महत्वाच्या असलेल्या सामन्यात थेट शतकी खेळी करत सर्व टीकाकारांची तोंडे बंद केली.

Shubman Gill T20 Century IND vs NZ 3rd T20
IND vs NZ 3rd T20 LIVE : गिलचा विक्रमी शतकी धमाका; भारताने उभारला 234 धावांचा डोंगर

शुभमन गिल हा भारताचा तीनही क्रिकेट फॉरमॅटमध्ये शतकी खेळी करणारा 5 वा फलंदाज ठरला. तसेच त्याने टी 20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील केला. त्याने या यादीत रोहित शर्मा (118) आणि विराट कोहलीला (122) मागे टाकले. गिलने 63 चेंडूत नाबाद 126 धावा ठोकल्या. विशेष म्हणजे गिलची ही विक्रम खेळी पाहण्यासाठी सचिन तेंडुलकर देखील मैदानात उपस्थित होता.

शुभमन गिल आणि बढती मिळालेल्या राहुल त्रिपाठीने भारताला पॉवर प्लेमध्येच अर्धशतकी मजल मारून दिली. बढती मिळालेल्या त्रिपाठीने पॉवर प्लेच्या उत्तरार्धात आपला गिअर बदलला. त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारत 22 चेंडूत 44 धावा चोपल्या. त्याने भारताला 8 षटकात जवळपास 80 धावांपर्यंत पोहचवले होते.

Shubman Gill T20 Century IND vs NZ 3rd T20
Sachin Tendukar : तुम्ही सर्वांनी नव्या स्वप्नांना जन्म दिला... सचिनने वर्ल्डकप विनर टीमची थोपटली पाठ

त्याने अर्धशतकाच्या रेसमध्ये गिलला देखील मागे टाकले. मात्र तो षटकार मारण्याच्या नादात बाद झाला आणि त्याचे अर्धशतक अवघ्या 6 धावांनी हुकले. मात्र राहुल त्रिपाठी आपले काम करून गेला होता. तो बाद झाला त्यावेळी भारताच्या 8.2 षटकात 87 धावा झाल्या होत्या. यानंतर गिलने आपले अर्धशतक 35 चेंडूत पूर्ण केले. दरम्यान, सूर्याने गिलची साथ सोडली.

Shubman Gill T20 Century IND vs NZ 3rd T20
Prithvi Shaw : तिसऱ्या टी20 सामन्यात पांड्याने अखेर संघात बदल केला मात्र पृथ्वी शॉ...

मात्र गुजरात टायटन्स आणि टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्या शुभमन गिलला साथ देण्यासाठी आला. या दोघांनी आपला गिअर बदलत आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. गिलने 54 चेंडूत शतकी मजल मारत भारताला 200 च्या पार पोहचवले. अखेर पांड्या 30 धावांवर बाद झाला. मात्र तोपर्यंत त्याने गिलसोबत 103 धावांची शतकी भागीदारी केली होती. शुभमन गिलने संपूर्ण 20 षटके खेळत नाबाद 126 धावा केल्या. त्यामुळे भारताने 20 षटकात 4 बाद 234 धावांपर्यंत मजल मारली.

(Sports Latest News)

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शॉ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com