IND vs NZ: द्विशतकानंतरही गिलचे संघात स्थान निश्चित नाही; माजी फलंदाजी प्रशिक्षकांचे मोठे विधान

द्विशतक झळकावल्यानंतरही शुभमन गिलची जागा संघात निश्चित झालेली नाही...
Shubman Gill
Shubman Gillsakal

Shubhman Gill : भारत आणि न्यूझीलंडमधील तीन एकदिवसीय मालिकेचा दुसरा सामना आज रायपूरमध्ये खेळल्या जाणार आहे. 18 जानेवारीला खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने 12 धावा जिंकल्या. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शुबमन गिलने दुहेरी शतक केले. द्विशतक झळकावल्यानंतरही शुभमन गिलची जागा संघात निश्चित झालेली नाही असे भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांना वाटते.

Shubman Gill
IND vs AUS: थप्पड की गुंज! गर्लफ्रेंडने काढला कानाखाली जाळ आता BCCI देणार दणका?

स्टार स्पोर्ट्स शो मॅच पॉईंटवरील चर्चेदरम्यान संजय बांगरला विचारण्यात आले की शुभमन गिलने त्याच्या द्विशतकानंतर सलामीवीर म्हणून आपले स्थान निश्चित केले आहे का? यावर संजय बांगर म्हणतात, मला अद्याप खात्री नाही कारण वरवर पाहता एक डावखुरा फलंदाज (इशान किशन) आहे.

Shubman Gill
Ronaldo Vs Messi : पुन्हा मेस्सीचं ठरला वरचढ ! 2 गोल करूनही रोनाल्डो पडला फिका

मात्र, विश्वचषकात शुभमन गिल, इशान किशन आणि रोहित शर्मा यापैकी केवळ दोनच सलामीवीर म्हणून दिसणार असल्याचे संजय बांगर यांनी सांगितले. संजय बांगर म्हणाले, भारतीय क्रिकेटसाठी ही मोठी गोष्ट आहे की आता इतर पर्यायांकडे पाहिले जाणार नाही. आता या तिघांपैकी दोन 50 षटकांच्या विश्वचषकात भारतीय संघासाठी नक्कीच सलामी देतील.

Shubman Gill
सगळ्यांना वाटलं तो संपलाय ...' महान खेळाडूसाठी विराटने ठेवली भावुक स्टोरी

काय म्हणाले संजय मांजरेकर?

संजय मांजरेकर म्हणाले, “बांगर काय बोलू पाहत आहेत हे मला माहीत आहे. तो विश्वचषक संघाकडे पाहत आहे आणि त्यात त्याला फारसा वेळ नाही. त्याआधी आयपीएल होणार आहे आणि जवळपास 20 एकदिवसीय सामने होणार आहेत, त्यामुळे काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com