Shubman Gill : सिक्स पॅक अॅब्जच्या बाबतीत गिल म्हणजे नेक्स्ट विराट कोहलीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shubman Gill Showing Six Pack Abs

Shubman Gill : सिक्स पॅक अॅब्जच्या बाबतीत गिल म्हणजे नेक्स्ट विराट कोहलीच

Shubman Gill Six Pack Abs IND vs SA : भारताचा युवा वनडे संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा दुसरा वनडे सामना खेळण्यासाठी रांचीत दाखल झाला आहे. या सामन्यापूर्वी भारताचा सलामीवीर शुभमन गिल, कर्णधार शिखर धवन आणि इशान किशन यांनी स्विमिंग पूलमध्ये चिल करण्याचा आनंद घेतला. दरम्यान हँड्सम हंक असलेल्या शुभमन गिलने पुन्हा एकदा लाईम लाईट आपल्याकडे खेचली. त्याचा शर्टलेस फोटो पाहून रांचीचे तापमान नक्कीच वाढले असणार.

हेही वाचा: INDW vs BANW : पाकने दिलेल्या पराभवातून सावरत भारत पुन्हा विजयीपथावर

महेंद्रसिंह धोनीचे शहर रांचीत चर्चा फक्त शुभमन गिलच्या शर्टलेस फोटोचीच आहे. सध्या सोशल मीडियावर शुभमन गिल, शिखर धवन आणि इशान किशनचा हा पूलमधील फोटो व्हायरल होत आहे. दरम्यान, शुभमन गिलचे सिक्स पॅक्स अॅब्ज पाहून सर्वांना विराट कोहलीची आठवण झाली. भारतीय संघातील सर्वात फिट बॉडी असलेला खेळाडू म्हणजे विराट कोहली. मात्र नुकत्याच समोर आलेल्या फोटोवरून विराटचा वारसा शुभमन गिलच पुढे चालवणार हे जवळपास सिद्ध होतयं.

हेही वाचा: Ramiz Raja : रमीझ राजा म्हणतात, आता कुठं भारतानं पाकिस्तानला आदर देणं सुरू केलयं...

दरम्यान, भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा पहिला वनडे सामना गमावला. या सामन्यात भारताच्या टॉप ऑर्डरला धावा करता आल्या नव्हत्या. आता रांची येथील दुसऱ्या सामन्यात भारताची टॉप ऑर्डर शिखर धवन, शुभमन गिल यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.