Shubman Gill VIDEO : जिगरबाज शुभमन! कुलदीपच्या गोलंदाजीवर घेतला भन्नाट कॅच, विराटही पडला प्रेमात

Shubman Gill Short Leg Catch
Shubman Gill Short Leg Catchesakal

Shubman Gill Short Leg Catch : कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात फिल्डिंगची सर्वात आव्हानात्मक जागा ही सिली पॉईंट आणि शॉर्ट लेग ही असते. भले भले खेळाडू येथे फिल्डिंग करण्यात घाबरत असतात. कसोटी संघातील युवा खेळाडूची पहिली 'पोस्टिंग' तिथेच होत असते. तिथे डोळ्यात तेल ओतून फिल्डिंग करावी लागते. तसेच फलंदाने मारलेले जोरदार फटेक अंगावर झेलावे लागतात. त्यामुळेत इथे फिल्डिंग करण्यासाठी जिगरबाज असणे गरजेचे असते. असा जिगरबाजपणा भारतीय कसोटी संघातील युवा फलंदाज शुभमन गिलने आज दाखवला.

Shubman Gill Short Leg Catch
BAN vs IND 1st Test : कुलदीप यादवने बांगलादेशला त्यांच्यात जाळ्यात अडकवले

बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी बांगलादेशने आपला दुसरा डाव सुरू केला. सुरूवातीला मोहम्मद सिराजने बांगलादेशची वरची फळी कापून काढली. त्यानंतर कुलदीप यादवने आपल्या फिरकीच्या जाळ्यात एक एक करत बागंलादेशच्या मधल्या फळीतील सर्व फलंदाज अडकवण्यास सुरूवात केली. मात्र मुशफिकूर रहीम आणि नरूल हसन यांनी भागीदारी रचत डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

याचवेळी 32 वे षटक टाकणाऱ्या कुलदीप यादवचा पहिलाच चेंडू चांगला टर्न झाला. या फिरकीवर 16 धावांवर खेळणारा नरूल चाचपडला त्याने चेंडू फ्लिक केला. मात्र शॉर्टलेगला उभ्या असलेल्या शुभमन गिलने आपली एकाग्रता ढळू न देता हा मिलिसेकंदात तो झेल टिपला. यावेळी शुभमन गिल कुठेही घाबला असल्याचे किंवा आपले अंग चोरत असल्याचे दिसले नाही. त्याने चेंडूवर आपली नजर कायम ठेवत हा सोपा दिसणारा मात्र अत्यंत अवघ असलेला झेल टिपला.

शुभमन गिलने हा झेल टिपल्यानंतर स्लीपमध्ये उभ्या असलेल्या विराटने तर गिलला मिठीच मारली. याचबरोबर संपूर्ण संघाने गिलच्या या धाडसी आणि चपळतेचे दर्शन घडवणाऱ्या कॅचचे जोरादार कौतुक केले. दरम्यान, भारताने दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला त्यावेळी भारताने बांगलादेशची अवस्था 8 बाद 133 धावा अशी केली. मोहम्मद सिराजने बांगलादेशची टॉप ऑर्डर उडवली तर कुलदीपने मधल्या फळीला खिंडार पाडले. सिराजने 14 धावात 3 तर कुलदीपने 33 धावात 4 विकेट्स घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com