IND vs NZ Test | "तो' खेळणार हे नक्की, पण कितव्या नंबरवर ते मी सांगणार नाही" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Team-India

महत्त्वाच्या फलंदाजाबद्दल उपकर्णधार चेतेश्वर पुजाराची स्पष्टोक्ती

"तो' खेळणार हे नक्की, पण कितव्या नंबरवर ते मी सांगणार नाही"

भारतीय संघाने न्यूझीलंड विरूद्ध तीन टी२० सामन्यांची मालिका ३-०ने जिंकली. पहिल्या दोन सामन्यात आव्हानाचा पाठलाग करताना तर तिसऱ्या सामन्यात आव्हानाचा बचाव करताना टीम इंडियाने मालिकेत बाजी मारली. आता न्यूझीलंड विरूद्ध भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पहिल्या सामना २५ ते २९ नोव्हेंबर आणि दुसरा सामना ३ ते ७ डिसेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. संपूर्ण कसोटी मालिकेसाठी रोहित शर्माला आणि पहिल्या सामन्यासाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात अजिंक्य रहाणे कर्णधार आणि चेतेश्वर पुजारा उपकर्णधार असणार आहे. या मालिकेआधी चेतेश्वर पुजाराने एका महत्त्वाच्या फलंदाजाबद्दल सूचक विधान केलं.

हेही वाचा: IND vs NZ: हिटमॅनचा 'झकास' विक्रम; विराट, धोनीला टाकलं मागे

"सध्या संघाच्या प्लॅन्सबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. पण शुबमन गिला हा खूप प्रतिभावान खेळाडू आहे. त्यामुळे त्याचा संघात समावेश केला जाईल ही गोष्ट नक्की आहे. त्याच्यासारखा खेळाडू चांगली कामगिरी करण्यासाठीच ओळखला जातो. त्यामुळे त्याच्याबद्दल फारशी चिंता करण्यासारखं काहीच नाही. गेल्या काही वर्षांमध्ये तो दमदार क्रिकेट खेळत आहे. पदार्पण केल्यापासूनच तो चांगली फलंदाजी करत आहे. इंग्लंड दौऱ्यावर त्याला संघाबाहेर राहावं लागलं ही बाब दुर्दैवी आहे. पण यावेळी तो संघात नक्कीच असेल. फक्त तो कितव्या क्रमांकावर खेळेल हे मी आताच सांगणार नाही", असं सूचक विधान उपकर्णधार चेतेश्वर पुजाराने केलं.

लोकेश राहुल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर

कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याआधी भारताला मोठा धक्का बसला. रोहित आणि विराट दोघांनाही विश्रांती दिलेली असतानाच लोकेश राहुलही दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर गेला. त्याच्या डाव्या मांडीचे स्नायू दुखावले गेले. त्यामुळे त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली. आता तो दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाऊन योग्य उपचार आणि सराव करेल आणि त्यानंतरच आगामी दौऱ्यासाठी निवडीला पात्र ठरेल. त्याच्या जागी वरिष्ठ संघाच्या निवड समितीने सूर्यकुमार यादवची निवड केली आहे.

loading image
go to top