मुंबई शहर संघाची श्वेता पारटेला जेतेपदाचा मान

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 जून 2018

पुणे, ता. 21 ः सिंबायोसिस स्पोर्टस सेंटरच्या वतीने आयोजित पहिल्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत महिला गटाचे विजेतेपद मुंबई शहर संघाच्या श्वेता पारटेने मिळविले.

पुणे, ता. 21 ः सिंबायोसिस स्पोर्टस सेंटरच्या वतीने आयोजित पहिल्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत महिला गटाचे विजेतेपद मुंबई शहर संघाच्या श्वेता पारटेने मिळविले.
प्रभात रस्त्यावरील सिंबायोसिस स्पोर्टस सेंटरमध्ये झालेल्या या स्पर्धेत महिला गटातील अंतिम लढतीत चौथे मानांकन असलेल्या श्वेता पारटेने मुंबई उपनगरच्या दुसऱ्या मानांकित ममता प्रभूचे आव्हान 14-12, 16-14, 11-8, 8-11, 11-5 असे परतावून लावले. या लढतीत जोरदार खेळ करणाऱ्या श्वेता पारटेने पहिल्या तीन गेम जिंकून 3-0 अशी आघाडी मिळवली; परंतु ममता प्रभूने चौथी गेम 11-8 अशी जिंकून आघाडी 3-1ने कमी केली. परंतु श्वेता पारटेने पाचवनी गेम 11-5 अशी सहज जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी झालेल्या उपांत्य फेरीत श्वेता पारटेने
नागपूरच्या अव्वल मानांकन असलेल्या मल्लिका भांडारकरचा 11-4, 7-11, 11-3, 11-8, 11-8 असा, तर ममता प्रभूने तिसरे मानांकन असलेल्या सेनोरा डिसूझाचा रंगतदार सामन्यात 7-11, 12-10, 11-7, 8-11, 11-7, 7-11, 11-6 असा पराभव केला होता. तर उपांत्यपूर्व फेरीत श्वेता पारटेने मुंबई शहर संघाच्या पाचव्या मानांकित मानसी चिपळूणकरचा 11-8, 6-11, 11-8, 14-12, 11-9 असा, मल्लिका भांडारकरने पुण्याच्या नववे मानांकन असलेल्या ईशा जोशीचा 11-6, 11-7, 11-7, 11-7 असा, ममता प्रभूने सातवे मानांकन असलेल्या मुंबई उपनगरच्या मृण्मयी म्हात्रेचा 11-6, 11-1, 11-5, 11-8 असा तर सेनोरा डिसूझाने मुंबई उपनगरच्या अनन्या बसाकचा 11-5, 11-6, 11-6, 11-6 असा पराभव केला होता.
Web Title: Shweta parte wins state table tennis competition