...म्हणून रोमानिया ब्यूटीने फ्रेंच ओपनमधून घेतली माघार!

30 मे पासून फ्रेंच ओपन स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
 Simona-Hallep
Simona-Hallepfile photo

महिलांच्या जागतिक टेनिस क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेली रोमानियाची सिमोना हालेप हिने आगामी फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतलीये. 29 वर्षीय सिमोना हिने 2018 साली फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. इटालियन ओपन स्पर्धेत स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे तिला आगामी फ्रेंच ओपन स्पर्धेला मुकावे लागणार आहे. 30 मे पासून फ्रेंच ओपन स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

 Simona-Hallep
WTC : अश्विनला विश्वविक्रमाची संधी!

ग्रँडस्लॅम स्पर्धेतून माघार घेणं हे माझ्या विचाराच्या आणि अपेक्षांच्या विरोधात आहे. पण याशिवाय माझ्यासमोर अन्य कोणताही पर्याय नाही. दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ लागणार असल्यामुळे स्पर्धेत न खेळण्याचा निर्णयच योग्य वाटतो. सिमोनने फ्रेंच ओपन स्पर्धेत तीन वेळची फायनलिस्ट असून 2018 च्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत तिने अमेरिकेच्या स्लोएन स्टीफन्सला पराभूत करत स्पर्धा जिंकली होती.

 Simona-Hallep
एका रात्रीतल्या श्रीमंतीनं गडबडून गेलेला खेळाडू

पॅरिसच्या कोर्टवर खेळण्यास मुकणार हा विचार मनाला सहन होत नाही. याचे दु:खही होत आहे. दुखापतीतून सावरुन लवकरात लवकर कोर्टवर परतण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही तिने आपल्या चाहत्यांना उद्देशून म्हटले आहे. ती विम्बल्डनची गतविजेती आहे. 2019 मध्ये तिने विम्बल्डन स्पर्धा जिंकली होती. मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डन स्पर्धा रद्द करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी 28 जूनला ही स्पर्धा नियोजित आहे. फ्रेंच ओपनला मुकल्यानंतर विम्बल्डन ओपनमधील जेतेपद आपल्याकडेच ठेवण्याच्या इराद्याने कोर्टवर कमबॅक करण्यासाठी ती उत्सुक असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com