सिंधू आक्रमकतेत कमी पडली - गोपीचंद

वृत्तसंस्था
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

दडपणाखाली येताच सिंधूने चुका केल्या आणि आक्रमकतेत ती कमी पडली, अशी कारणमीमांसा प्रशिक्षक गोपीचंद यांनी केली. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू अंतिम सामन्यात कॅरेलिना मरिनकडून पराभूत झाल्यानंतर गोपीचंद बोलत होते.

अंतिम सामन्यात तिने जो खेळ केला, त्यापेक्षा अधिक चांगला खेळ करता आला असता, पण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, तिला सर्व सामने सायंकाळी उशिरा खेळावे लागले, त्याचा परिणाम प्रामुख्याने बाद फेरीच्या सामन्यात झाला. अंतिम सामन्यापूर्वीही ती काहीशी दमलेली होती, असे गोपीचंद यांनी सांगितले.

आम्ही जेवढी अपेक्षा केली होती, तेवढी आक्रमकता सिंधूला दाखवता आली नाही. जागतिक स्पर्धेचा अंतिम सामना खेळताना वेगळ्याच प्रकारचे दडपण असते, असे सांगून गोपीचंद म्हणाले, की शटलचा वेग आणि दिशा यावर नियंत्रण मिळण्यासाठी सिंधूला प्रयत्न करावे लागतील. अंतिम सामन्यात पराभव झाला, तरी सिंधूने आत्मविश्‍वास कमकुवत होऊ देऊ नये. विजेतेपद निसटले असले, तरी तिने पुन्हा एकदा शानदार कामगिरी केली आहे. 

अंतिम सामन्याचा अडथळा पार करण्यात सिंधूला अपयश येत आहे, याची चिंता करण्याचे कारण नाही. ती किती सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहे, हे अशा निकालावरून स्पष्ट होत नाही. सलग दोन वर्षे जागतिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवणे हा विनोद नाही.
- पुल्लेला गोपीचंद

Web Title: Sindhu didnt fire as expected