
Mumbai: आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला नावलौकिक मिळवून देणारा जागतिक कॅरम चॅम्पियन संदीप दिवे यांच्यावर जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे.
२०२२ मध्ये मलेशियात झालेल्या स्पर्धेत संदीप यांनी विश्वविजेतेपद पटकावले होते; परंतु शासनाकडून योग्य सन्मान आणि आर्थिक आधार न मिळाल्याने कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला हा विश्वविजेता सध्या तुटपुंज्या मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे.