

अफगाणिस्तानने अष्टपैलू खेळाच्या जोरावर माजी विजेत्या श्रीलंकेला पराभवाचा धक्का दिला. ही लढत सहज जिंकून अफगाणिस्तानने पुण्यातील प्रेक्षकांची मने जिंकली. या लढतीला अखेरच्या क्षणी जवळपास चौदा हजार चाहते उपस्थित होते. स्टेडियम हाउसफुल झाले नसले, तरी पुणेकरांचा पाठिंबा अफगाणिस्तान संघाला होता. जिंकल्यानंतर अफगाणिस्तान संघाने मैदानाला फेरी मारून चाहत्यांचे आभार मानले.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानात सोमवारी ही लढत झाली. दुपारी दोनच्या सुमारास मैदानात केवळ दोन-तीन हजार प्रेक्षकच उपस्थित होते. ऊन असल्याने आणि भारताची लढत नसल्याने प्रेक्षकांनी स्टेडियमकडे पाठ फिरविल्याचे चित्र सुरुवातीला दिसले. मात्र, संध्याकाळ होताच प्रेक्षकांची पावले मैदानाकडे वळली. त्यामुळे रात्री आठ नंतर प्रेक्षकसंख्या १४ हजारांपर्यंत जाऊन पोहोचली.
याच मैदानावर काही दिवसांपूर्वी भारत -बांगलादेश लढत झाली होती. त्या वेळी मैदानापर्यंत पोहोचण्यासाठी प्रेक्षकांना अडथळ्याची शर्यत पार करावी लागली होती. प्रेक्षकांना वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या जाणवली होती. या वेळी सुरुवातीला प्रेक्षकसंख्याच कमी असल्याने तशी काही समस्या जाणवली नाही. त्याचबरोबर आयोजक महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने जागोजागी लावलेल्या सूचना फलकांमध्ये वाढ केली होती. त्याचबरोबर स्वच्छतागृहांमधील कर्मचारी संख्याही वाढवलेली दिसली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.