esakal | SL vs IND : द्रविड & धवन कंपनीच्या डिनर पार्टीची चर्चा!
sakal

बोलून बातमी शोधा

Dravid Bhuvneshwar adn Dhavn

SL vs IND : द्रविड & धवन कंपनीच्या डिनर पार्टीची चर्चा!

sakal_logo
By
सुशांत जाधव

श्रीलंका दौऱ्यावरील मर्यादित षटकांच्या मालिकेत धवन ब्रिगेडने दमदार कामगिरी नोंदवली. पहिल्या दोन वनडे सामन्यातील विजयासह भारतीय संघाने मालिका खिशात घातली. या मालिका विजयानंतर कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) उप-कर्णधार भुवी यांनी कोच द्रविड यांच्यासोबत डिनर पार्टी केली. शिखर धवनने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन डिनर पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर रंगणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेपूर्वी धवनने शेअर केलेल्या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसते. (SL vs IND Shikhar Dhawan Bhuvneshwar Kumar And His Wife Nupur Dinner With Coach Rahul Dravid )

दुसऱ्या वनडे सामन्यातील विजयासह मालिका 2-0 अशी खिशात घातल्यानंतर धवनने या मालिकेत टीम इंडियाच्या कोचची जबाबदारी पार पाडणाऱ्या राहुल द्रविड यांच्यासोबत डिनर पार्टी केली. यावेळी उप कर्णधार भुवनेश्वर पत्नी नुपूरसह हजर होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली एक भारतीय संघ रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंड दौऱ्यावर आहे. दुसरीकडे धवनच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंकेत आहे.

हेही वाचा: ENG vs IND : मास्कवरुन नेटकऱ्यांनी घेतली पंतची शाळा!

पहिल्यांदाच टीम इंडियाच्या नेतृत्वाची धूरा सांभाळणाऱ्या धवनने खास कॅप्शनसह फोटो शेअर केलाय. उत्तम लोकांसोबतची सुंदर रात्र! असे वर्णन त्याने या डिनर पार्टीतील फोटोचे केले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना शुक्रवारी 23 जुलै रोजी रंगणार आहे.

हेही वाचा: ENG vs IND : इंग्लंडला मदत करणं टीम इंडियाच्या आलं अंगलट

या सामन्यात गब्बर अर्थात शिखर धवनला एक विक्रम करण्याची संधी आहे. जर भारतीय संघाने हा सामना जिंकला तर टीम इंडियाचे पहिल्यांदा नेतृत्व करताना प्रतिस्पर्ध्याला क्लीन स्वीप करण्याचा खास रेकॉर्ड धवनच्या नावे होईल. भारतीय संघाचा माजी आणि यशस्वी कर्णधार अशी ओळख असलेल्या महेंद्र सिंह धोनीलाही असा पराक्रम करता आलेला नाही. विद्यमान कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सातत्याने दमदार कामगिरी करत असली तरी विराटलाही ही किमया करता आलेला नाही. याशिवाय भारतीय संघाची ज्याने बांधणी केली तो सौरव गांगुलीही असा पराक्रम करु शकला नाही.

loading image