SL vs IRE T20WC22 : कोरोना पॉझिटिव्ह खेळाडू उतरला मैदानात; आयर्लंडने घेतली मोठी रिक्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Potentially covid positive Dockrell picked in Ireland XI

SL vs IRE T20WC22 : कोरोना पॉझिटिव्ह खेळाडू उतरला मैदानात; आयर्लंडने घेतली मोठी रिक्स

Covid Positive Dockrell Picked In Ireland-11 : टी-20 विश्वचषकाचा 15 वा सामना श्रीलंका आणि आयर्लंड यांच्यामध्ये होबार्ट येथे खेळल्या जात आहे. आयर्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयर्लंडचा फिरकी गोलंदाज जॉर्ज डॉकरेल हा कोविड-19 पॉझिटिव्ह आला असूनही, तो श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात आयर्लंडच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार आहे. क्रिकेट आयर्लंडने सामना सुरू झाल्यानंतर अधिकृत निवेदन जारी करून याची पुष्टी केली आहे.

हेही वाचा: IND vs PAK Streaming : भारत-पाक सामना 'फ्री' पाहता येणार, नाही गरज कोणत्याही सब्सक्रिप्शनची

आयर्लंड क्रिकेटने डॉकरेलचे कोरोनाचे लक्षण खूप कमी असल्याचे सांगितले आहे. वैद्यकीय पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. सामने आणि प्रशिक्षणादरम्यान, डॉकरेल शक्य तितक्या इतर खेळाडूंच्या संपर्कात येणार नाही. तो संघापासून वेगळा प्रवास करणार आहे.

आयसीसीच्या नियमांनुसार या टी-20 विश्वचषकात कोविड-19 पॉझिटिव्ह असूनही प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळाडूचा समावेश केला जाऊ शकतो. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि संघात कोणताही बदल केला नाही. आयर्लंडची सुरुवात खराब झाली.

हेही वाचा: IND vs PAK Melbourne Weather : ऑस्ट्रेलियाचे वेदर काय म्हणत; भारत-पाक भिडणार की स्वतःच थैमान घालणार

श्रीलंका आणि आयर्लंडचा सुपर-12 मधील हा पहिलाच सामना आहे. पहिल्या फेरीत विजय मिळवून श्रीलंका आणि आयर्लंडने सुपर-12 मध्ये स्थान मिळवले आहे. दोन्ही संघांना या फेरीची सुरुवात विजयाने करायची आहे. या सामन्यात श्रीलंकेने एक बदल केला. पाठमू निसांका दुखापतीमुळे हा सामना खेळत नाही.