Smriti Mandhana : ट्रॉफी अंपायर्सना द्या.... हरमनने पातळी सोडली, स्मृती काय म्हणाली?

Smriti Mandhana BANW vs INDW
Smriti Mandhana BANW vs INDWEsakal

Smriti Mandhana BANW vs INDW : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि बांगलादेश महिला क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा वनडे सामना हा टाय झाला. यामुळे भारत आणि बांगलादेश यांना मालिकेचा संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. तिसऱ्या वनडे सामन्यात अंपायरिंगवरूनही मोठा गदारोळ झाला.

भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने मैदानावरच आक्रमकरित्या खराब अंपायरिंगविरूद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर कौरने ट्रॉफी लिफ्टिंगच्या कार्यक्रमावेळी देखील अंपायर्सला टोमणे मारले. (Harmanpreet Kaur News)

याचबरोबर बांगलादेशची कर्णधार निगार सुल्ताना देखील फोटो शूटला न थांबता तेथून निघून गेली. यामुळे हरमनप्रीतवर खेळ भावनेचा आदर न केल्याची टीका होत आहे.

Smriti Mandhana BANW vs INDW
WI vs IND 2nd Test Day 4 LIVE : मोहम्मद सिराजचा पंजा! विंडीजचा पहिला डाव 255 धावात संपुष्टात

दरम्यान, भारताची उपकर्णधार स्मृती मानधनाला देखील पत्राकर परिषदेत हाच प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने आपल्या कर्णधाराची आक्रमकरित्या पाठराखण केली. इएसपीएन क्रिक इन्फोने दिलेल्या वृत्तानुसार ट्रॉफी उचलायला अंपायर्सना देखील बोला असे हरमनप्रीत ओरडत असल्याचा दावा करण्यात आला आहे. (India Women's Cricket Team Controversy)

स्मृती म्हणाली की, 'मला नाही वाटत की तिने असं काही म्हटलं असेल. मला नाही वाटत की हरमन बांगलादेशच्या कर्णधाराला उद्येशून काही बोलली असेल. मी जे काही ऐकलं आहे त्यानुसार ती अंपायरिंगबद्दल बोलत होती. मला नाही वाटत की ती बांगलादेश संघाविरूद्ध काही बोलली आहे.'

Smriti Mandhana BANW vs INDW
India A vs Pakistan A : आधी नो बॉलवर विकेट नंतर एज नसतानाही बाद... पाकिस्तानने केलंय फिक्सिंग?

स्मृती पुढे म्हणाली की, 'आपण जे सामन्यादरम्यान झालं नाही त्याबद्दल बोलणं टाळलं पाहिजे. सामन्यानंतरच्या घटना या ऑन कॅमेरा होत नाहीत. या गोष्टी पोस्ट मॅच प्रेझेंटेशन नंतर झाल्या आहेत. त्यामुळे त्याबद्दल बोलणं टाळलं पाहिजे.'

अंपायर्सनी हरमनप्रीत कौरला वादग्रस्तरित्या बाद दिल्यानंतर तिने स्टम्पवर आपला राग काढला होता. त्यामुळे तिला आयीसीकडून दंड देखील ठोठावण्यात आला आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com