स्मृती - शेफालीची धडाकेबाज फलंदाजी; मालिकेत भारताची विजयी आघाडी

Smriti Mandhana Shafali Verma Shine Indian Women's Cricket Team Defeat Sri Lanka
Smriti Mandhana Shafali Verma Shine Indian Women's Cricket Team Defeat Sri Lankaesakal

पल्लेकेल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women's Cricket Team) दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेचा (Sri Lanka) तब्बल 10 विकेट्स राखून पराभव करत मालिकेत 2 - 0 अशी विजयी आघाडी घेतली. भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करत श्रीलंकेचा डाव 173 धावात गुंडाळला होता. हे आव्हान भारताने 26 षटकात एकही फलंदाज न गमावता पार केले. भारताची सलामीवीर स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि शेफाली वर्मा (Shafali Verma) यांनी दमदार फलंदाजी केली. स्मृती मानधनाने 83 चेंडूत 94 धावा ठोकल्या तर शेफाली वर्माने 71 चेंडूत 71 धावा केल्या. भारताकडून गोलंदाजीत रेणुका सिंहने 4 विकेट घेतल्या. तिला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. रेणुका सिंहला मेघना सिंग आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

Smriti Mandhana Shafali Verma Shine Indian Women's Cricket Team Defeat Sri Lanka
ENG vs IND Live Day 4 : भारताची आघाडी 350 पार; जडेजा - शमीची आक्रमक फलंदाजी

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारताने पहिल्या षटकापासूनच श्रीलंकेला धक्के देण्यास सुरूवात केली. रेणुका सिंहने श्रीलंकेचे दोन्ही सलामीवीर परेरा आणि गुणरत्ने यांना बाद केले. पाठोपाठ माधवीला देखील शुन्यावर बाद कर लंकेला तिसरा धक्का दिला. त्यानंतर लंकेने डाव सावण्याचा प्रयत्न केला. मात्र मेघना सिंहने कर्णधार आटापटूला 27 धावांवर बाद करत लंकेला मोठा धक्का दिला. त्यानंतर अनुष्का संजिवनी आणि निलाक्षी दे सिल्वा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघींनी संघाला 70 धावांपर्यंत मजल मारून दिली.

त्यानंतर मात्र संजिवनी आणि कविशा दिलहारी पाठोपाठ धावबाद झाल्या. यामुळे लंकेची अवस्था 6 बाद 81अशी झाली. अखेर अमा कांचना आणि निलाक्षी यांनी लंकेला शंभरी पार करून दिली. मात्र निलाक्षीला 32 धावांवर बाद करत मेघना सिंहने ही जोडी फोडली. लंकेच्या इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. कांचनाने एकाकी झुंज देत नाबाद 47 धावांची खेळी केली. अखेर लंकेचा डाव 173 धावांवर संपुष्टात आला.

Smriti Mandhana Shafali Verma Shine Indian Women's Cricket Team Defeat Sri Lanka
ENG vs IND : जसप्रीत बुमराहने इंग्लंड दौऱ्यावर केले मोठे रेकॉर्ड

श्रीलंकेचे विजयासाठी ठेवलेले 174 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी दमदार फलंदाजी करत बिनबादच 174 धावा केल्या. या दोघींनी 174 धावांची सलामी देत सामना 25 षटकातच संपवला. स्मृती मानधनाने 83 चेंडूत 94 धावांची आक्रमक खेळी केली. तिला शेफाली वर्माने 71 चेंडूत 71 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून विजयी आघाडी घेतली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com