FIFA World Cup 2022 : कतारमधील हवामानाचा परिणाम, खेळाडूंना उष्माघाताचा धोका

सध्या देशाचे तापमान ३० अंश सेल्सिअसदरम्यान असून, त्यामुळे खेळाडूंना उष्माघाताचा सामना करावा लागू...
FIFA World Cup 2022
FIFA World Cup 2022sakal

FIFA World Cup 2022 : कतारमध्ये रविवारी २० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत खेळाडूंना उष्माघाताचा सामना करावा लागू शकतो, असे मत शरीरविज्ञान शास्त्राचे डॉक्टर माईक टिप्टन यांनी व्यक्त केले आहे. याबाबत अधिक माहिती देताना टिप्टन म्हणाले, ‘‘कतारमध्ये वर्षभर उष्णच वातावरण असते. सध्या देशाचे तापमान ३० अंश सेल्सिअसदरम्यान असून, त्यामुळे खेळाडूंना उष्माघाताचा सामना करावा लागू शकतो. उष्माघातामुळे खेळाडूंच्या फक्त शरीरावरच प्रतिकूल परिणाम होत नाही, तर त्यांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवरही मोठ्या प्रमाणात फरक पडतो. यामुळे माणूस किंवा खेळाडू चुकीचे, खराब निर्णय घेण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.’’

FIFA World Cup 2022
Cricket News : वर्ल्डकपमधील परभवानंतर BCCI चा दे धक्का! सर्वच सलेक्टर्सची केली हकालपट्टी

‘सध्या कतारमध्ये उष्ण वातावरण असले तरी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील वातावरणात बदल होऊन तापमानात मोठ्या प्रमाणात घट होईल. उष्णतेचा सामना करायचा असल्यास संघाचे प्रशिक्षक आपल्या रणनीतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करू शकतात. खेळाडूंना कमी वेगाने खेळायला सांगितले जाऊ शकते.

युरोपात फुटबॉल खेळताना आणि येथे अरब देशात खेळताना खूप फरक पडतो. येथे खेळताना कोणताच खेळाडू सलग ९० मिनिटे सामना खेळू शकत नाही, असेही टिप्टन पुढे म्हणाले’. कतारमधील उष्णतेबाबत वेल्सच्या मार्क हॅरिसने सुद्धा मत व्यक्त केले असून तो म्हणाला, ‘‘हॉटेलच्या बाहेर चालायला गेलो तरी आम्हाला घामाच्या धारा येतात. आम्ही संघाच्या सराव सत्राच्या वेळेतसुद्धा बदल केला आहे. आता आम्ही दुपारी सराव न करता सायंकाळी वातावरणात बदल झाला की आणि तापमानात घट झाली की सराव करायला घेतो.’’ विश्वकरंडक स्पर्धा ज्या मैदानावर खेळवली जाणार आहे, त्या सर्वच मैदानांवर वातानुकूलित सुविधा असल्यामुळे खेळाडूंना काहीशा प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

FIFA World Cup 2022
FIFA World Cup Qatar :बीअर बॅन! कतारच्या कोलांटी उडीने फॅन्स अन् कंपन्यांना मोठा धक्का

फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा शक्यतो जून आणि जुलै या दोन महिन्यांमध्ये खेळवली जाते. मात्र २०१० मध्ये कतारला २०२२ च्या स्पर्धेचे आयोजन करण्याचे हक्क मिळाले तेव्हा त्यांनी आयोजनाच्या महिन्यात बदल करून ती नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांत खेळवायची असे ठरवले. त्यामुळे खेळाडूंनाही जुळवून घ्यावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com