Video: PSLमध्ये तनवीर-कटिंगच्यात झालायं राडा; 2018 चा बदला घेतला पण... | Sohail Tanvir Ben Cutting Showing Middle Finger each other in PSL | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sohail Tanvir Ben Cutting Showing Middle Finger each other in Pakistan Super League
Video: PSLमध्ये तनवीर-कटिंगच्यात झालायं राडा; 2018 चा बदला घेतला पण...

Video: PSLमध्ये तनवीर-कटिंगच्यात झालायं राडा; 2018 चा बदला घेतला पण...

पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) पेशावर जाल्मी आणि क्वेटा ग्लॅडियेटर्स यांच्यातील सामन्यात राडा झाला. पाकिस्तान डावखुरा वेगवान गोलंदाज सोहेल तनवीर (Sohail Tanvir) आणि बेन कटिंग (Ben Cutting) यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा मैदानावर उफाळून आला. दोघांच्याही या पातळी सोडून वागण्यावर दंड लागला आहे. त्यांच्या मॅच फीमधून 15 टक्के रक्कम दंड म्हणून कापून घेण्यात येणार आहे.

हेही वाचा: VIDEO: विराटचा सल्ला ऐकला अन् रोहित फसला

पीएसएल (PSL) पेशावर जाल्मी आणि क्वेटा ग्लॅडियेटर यांच्यातील सामन्यात क्वेटाचा वेगवान गोलंदाज सोहेल तनवीर गोलंदाजी करत होता. पेशावरकडून तर बेन कटिंग तुफान बॅटिंग करत होता. त्याने सोहेल तनवीरची चांगलीच धुलाई केली. 19 व्या षटकात कटिंगने सोहेल तनवीरला तब्बल 5 षटकार मारले. दरम्यान, बेन कटिंगने फलंदाजी करताना आपले मधले वोट (Middle Finger) दाखवत असभ्य वर्तन केले. त्याने 2018 च्या कॅरेबियन प्रीमियर लीगमधला बदला घेतला.

त्यानंतर भडकलेल्या तनवीरने देखील बेन कटिंगनेही त्याला प्रत्युत्तर दिले. मात्र त्यानंतर बेन कटिंगने पुन्हा षटकार मारला आणि पुन्हा मधले बोट दाखवले. यावरून तनवीर आणि बेन कटिंग यांच्यात बाचाबाची झाली. हा वाद सोडवण्यासाठी अंपायर्सना मध्यस्थी करावी लागली. बेन कटिंग जेव्हा बाद झाला त्यावेळी त्याचा कॅच सोहेल तनवीर कडेच गेला. तनवीरने देखील आपले मधले बोट दाखवत कटिंगला पॅव्हेलियनचा रस्ता धरण्यास सांगितले.

हेही वाचा: IND vs WI : मुंबईकरांच्या लॉबिंगमुळं पुणेकर ऋतूराज बाकावर?

विशेष म्हणजे तनवीर आणि बेन कटिंग यांच्यातील हे मधले बोट दोखवण्याची सुरूवात 2018 मध्ये झाली होती. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL) सोहेलने पहिल्यांदा बेन कटिंगला (Sohail Tanvir vs Ben Cutting) मधले बोट दाखवले होते. तीन चार वेळा मधली बोटं दाखवून झाल्यावर मात्र सोहेल तनवीरने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. तो म्हणाला आम्ही जे केलं ते लहान मुलांसाठी आदर्शवत नाही.

Web Title: Sohail Tanvir Ben Cutting Showing Middle Finger Each Other In Pakistan Super League Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..