IND vs WI : मुंबईकरांच्या लॉबिंगमुळं पुणेकर ऋतूराज बाकावर? | Ruturaj Gaikwad Better Than Ishan Kishan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Ishan Kishan And Ruturaj Gaikwad

IND vs WI : मुंबईकरांच्या लॉबिंगमुळं पुणेकर ऋतूराज बाकावर?

वेस्ट इंडीज विरुद्धच्या टी-20 मालिकेतही टीम इंडियाने दमदार विजयी सलामी दिली. पण या सामन्यात युवा सलामीवीर ऋतूराज गायकवाडवर (Ruturaj Gaikwad) पुन्हा एकदा बाकावर बसण्याची वेळ आली. लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने 15 कोटीच्या मुंबईकरासोबत (Mumbai Indian bought By Ishan Kishan Cr) टीम इंडियाच्या डावाला सुरुवात केली. त्यामुळे पुणेकर आणि धडाकेबाज ऋतूराज गायकवाडला बाकावरच बसावे लागले. भारतीय संघाने हा सामना जिंकला असला तरी ऋतूराज गायकवाडला बाहेर बसवल्याचे अनेकांना पटलेले नाही. मुंबईकरांच्या लॉबिंकमुळे त्याच्यावर बाकावर बसण्याची वेळ आलीये, अशा आशयाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटताना दिसते.

आयपीएलच्या गत हंगामात ऋतूराज गायकवाडनं (Ruturaj Gaikwad) सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने मानाची ऑरेंज कॅप पटकावून स्वत:ला सिद्ध केले, असा दाखला देत एका नेटकऱ्यांनी टीम इंडियाच्या (Team India) प्लेइंग इलेव्हनमध्ये ऋतूराज कुठं आहे? असा प्रश्न उपस्थितीत केला आहे. ऋतूराजला खेळवायला हवे होते,असेच या नेटकऱ्याला म्हणायचे आहे.

हेही वाचा: IND vs WI : टीम इंडिया जिंकली; अय्यरनं धोनी स्टाईल संपवली मॅच

ऋतूराज गायकवाड हा ईशान किशनच्या तुलनेत सर्वोत्तम आहे. त्यामुळे त्याला पहिली पसंती द्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे. पण...या अपूर्ण वाक्यातून ऋतूराज न खेळल्याची नाराजी व्यक्त होताना दिसते. एका नेटकऱ्यान तर ऋतूराज हा ईशानपेक्षा 100 पट्टीने सर्वोत्तम असल्याचे सांगत त्याला न खेळवण्याचा निर्णय पटलेला नसल्याची भावना व्यक्त केली आहे. ईशान किशनला प्रमाणापेक्षा बाहेर संधी दिली जात आहे, असे मतही व्यक्त करण्यात आले आहे.

हेही वाचा: VIDEO : हिटमॅननं 6 कोटींच्या गड्याला Eden Gardens वर दाखवल्या चांदण्या

एका नेटकऱ्याने तर मुंबई लॉबिंग असा उल्लेख करुन पुणे-मुंबई वाद तापवणारी पोस्ट केली आहे. त्याने ईशान किशनला मुंबई इंडियन्सने 15 कोटी विक्रमी बोली लावल्याचा दाखलाही दिलाय. आयपीएलमध्ये रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. ईशानसोबतच तो मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात करतो. दुसरीकडे ऋतूराज गायकवाड हा धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. त्यामुळे हे ट्विट मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या चाहत्यांमध्ये वाद पेटवणारे असेच आहे.

Web Title: Ind Vs Wi Ruturaj Gaikwad Better Than Ishan Kishan Netizens Talk Mumbai Lobby And Rohit Sharma Fans

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..