भारतीय महिला संघाचे अभिनंदन करताना गांगुलीने घेतला 'क्लास'

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला प्रथमच क्रिकेटमध्ये पदक मिळाले.
Sourav Ganguly
Sourav Gangulyesakal

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला प्रथमच क्रिकेटमध्ये पदक मिळाले. कॉमनवेल्थ गेम्सच्या क्रिकेट फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 9 धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने सुवर्णपदक पटकावले. तर भारताला रौप्यपदकावर सामाधान मानाव लागलं. मात्र, भारतीय क्रिकेट महिला संघावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने केलेले ट्विट चर्चेत आलं आहे.(Sourav Ganguly On India Women Cricket Team)

सौरव गांगुली यांनी ट्विट करत भारतीय महिला संघाचे ट्विट करत कौतुक केलेच पण सोबत कानउघडणी करण्याचा प्रयत्न केला. "कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय क्रिकेट महिलांनी रौप्यपदक जिंकलं. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. परंतु, ते निराश होऊन मायदेशात परतणार आहेत. कारण हा सामना पूर्णपणे त्यांचा होता." असं गांगुलीने ट्विट करत म्हटले आहे.

बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 162 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारत सर्व गडी गमावून 152 धावा करता आल्या. पराभवानंतरही भारतीय महिला क्रिकेट संघाने रौप्यपदक जिंकून इतिहास रचला आहे.

त्याआधी 1998 मध्ये क्रिकेट हा कॉमनवेल्थ गेम्सचा भाग होता. त्यानंतर भारतीय पुरुष संघाला एकही पदक जिंकता आले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com