Sourav Ganguly : BCCI च्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर दादाचा पुढचा 'प्लॅन' तयार

गांगुलीचे नाव आयसीसीच्या कार्याध्यक्ष पदासाठी शिफारस करण्याचीही चर्चा होती परंतु...
Sourav Ganguly
Sourav Gangulysakal

Sourav Ganguly : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) नवा अध्यक्ष मिळणार आहे. 18 ऑक्टोबर रोजी त्याची घोषणा होणार आहे. सौरव गांगुलीने यंदा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली नाही. अशा स्थितीत गांगुली आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज करू शकतो, असा अंदाज लोक बांधत होते. मात्र आता या प्रकरणात एक मोठे अपडेट समोर आले आहे.

Sourav Ganguly
आजपासून ऑस्ट्रेलियात T20 World Cup, पहिल्या फेरीत आशिया चॅम्पियन श्रीलंकेवर नजर

बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर गांगुली क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार आहे. गांगुलीचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यकाळ काही दिवसांत संपत आहे. बीसीसीआय अध्यक्षपदासाठी माजी दिग्गज क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांचे नाव आघाडीवर आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे मानले जात आहे. 18 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

Sourav Ganguly
VIDEO : लेहमधील सहावीत शिकणाऱ्या विराटच्या 'फॅनगर्ल'ची बॅटिंग बघाच

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदासाठी दुसरी टर्म न मिळालेले सौरव गांगुली बंगाल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. गांगुलीने दुसरी टर्म मिळण्याची संधी असतानाही त्यांना ती न दिल्याचे राजकारण झाल्याची चर्चा होत असताना आता ते क्रिकेट प्रशासनात राहण्यासाठी बंगाल क्रिकेट संघटनेचा मार्ग स्वीकारणार आहेत. गांगुलीचे नाव आयसीसीच्या कार्याध्यक्ष पदासाठी शिफारस करण्याचीही चर्चा होती; परंतु बीसीसीआयमधील विद्यमान पदाधिकारी त्यास तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Sourav Ganguly
Syed Mushtaq Ali Trophy : 'गोवेकर' अर्जुन तेंडुलकरची बलाढ्य हैदराबादविरूद्ध दमदार कामगिरी

गांगुली मूळचा पश्चिम बंगालचा असून त्याने यापूर्वी बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. 2015 ते 2019 पर्यंत CAB चा अध्यक्ष होता. यानंतर 2019 मध्ये तो बीसीसीआयचे अध्यक्ष झाला. आता तो पुन्हा राज्य क्रिकेट युनिटच्या प्रमुखपदासाठी अर्ज करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com