बीसीसीआय आज करणार मोठी घोषणा

sourav ganguly
sourav ganguly

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर(Corona 2nd wave)स्थगित झालेली बहूचर्चित आयपीएल स्पर्धा १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान दुबईत पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर येत्या क्रिकेट हंगामाची चर्चा करण्यासाठी बीसीसीआय आभासी विशेष सर्वसाधारण सभा (SGM) आज होणार आहे. या बैठकीचा अजेंड्यावर साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर येत्या क्रिकेट हंगामाचे भवितव्य तसेच आयपीएल पुन्हा सुरु करण्यासारखे विषय असणार आहेत. तसेच आयसीसी टी -२० विश्वचषक आणि मागील रणजी करंडक स्पर्धा रद्द झाल्यामुळे घरगुती क्रिकेटपटूंना देण्यात येणाऱ्या भरपाईच्या पॅकेजवरही चर्चा करण्याची संधी सदस्यांना मिळनार आहे. (Sourav Ganguly To Reach Mumbai For BCCI SGM, Focus On T20 World Cup, IPL, Domestic Players' Pay)

तसेच बीसीसीआयलादेखील भारतात टी -२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्याची इच्छा आहे, परंतू १ जून रोजी आयसीसी बोर्डाच्या बैठकीत जागतिक संघटनेने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कोविड -१९ च्या परिस्थितीची प्रतीक्षा करण्यास सांगितले आहे. यावरही चर्चा होईल. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे शनिवारी होणाऱ्या मुंबईच्या बैठकीचे अध्यक्ष असतील. यावेळी आयपीएल १८ ते २० सप्टेंबर दरम्यान पुन्हा सुरू करण्याबाबद आणि ते युएई, अबूधाबी, दुबई आणि शारजाह येथे तीन ठिकाणी खेळवले जाण्याविषयी निर्णय होईल.

sourav ganguly
WTC Final: सामना ड्रॉ झाला तर कोण जिंकणार? ICC म्हणतं...

‘‘अर्थात, मुख्य मुद्दा आयपीएलचे वेळापत्रक असेल. आम्ही फायनलसह चार प्ले-ऑफ गेम्स (२ क्वालिफायर, एक ईलिमिनेटर) व्यतिरिक्त १० दुहेरी-ल्पे ऑफ अपेक्षा करत आहोत. स्पर्धा पुन्हा सुरु करण्याबाबद आणि अंतिम सामना आठवड्याच्या शेवटी घेण्याबाबदही निर्णय यावेळी होईल." बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकीच्या आदल्या दिवशी पीटीआयला सांगितले. तसेच यावेळी परदेशी खेळाडूंच्या जैविक ते जैविक व सुरक्षित प्रवासाबाबदच्या पैलूंवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com