South Africa Coach Controversial Statement
esakal
भारतात कसोटी सामना जिंकणे कोणत्याही संघासाठी सोपे नाही. मात्र गेल्या एका वर्षात हे चित्र झपाट्याने बदलताना दिसत आहे. गेल्या वर्षी न्यूझीलंडने भारतात येऊन कसोटी मालिकेत भारताला ३-० ने पराभूत केलं होतं. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेतही भारतीय संघ क्लीन स्वीप होण्याच्या उंबरठ्यावर आहे. भारताची अशी दयनिय अवस्था होत असताना दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकांकडून भारताच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.