AUS Vs SA : चोकर्सचे बाद फेरीतील कच खाण्याचे अष्टक पूर्ण! फक्त 'झुंज'च चांगली देतात

AUS Vs SA
AUS Vs SA esakal

AUS Vs SA : ऑस्ट्रेलिया विरूद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण अफ्रिकेची अवस्था 4 बाद 24 धावा अशी केली होती. तेथेच ऑस्ट्रेलिया आजचा सामना जिंकणार हे स्पष्ट झालं.

मात्र डेव्हिड मिलरने 101 धावांची शतकी खेळी करत अफ्रिकेची आशा वाढवली होती. ऑस्ट्रेलियासमोर 213 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर अफ्रिकेच्या गोलंदाजांनी कांगारूंना टफ फाईट दिली.

कांगारूंची अवस्था 5 बाद 134 धावा केल्यानंतर अखेर कांगारूंनी सावध फलंदाजी करत आपला विजय 47.2 षटकात 7 बाद 213 धावांचे आव्हान पार करत नवव्यांदा फायनल गाठली. मात्र दक्षिण अफ्रिकेच्या नावासमोरचा चोकर्स हा शिक्का कायम राहिला. त्यांचा आठव्यांदा वर्ल्डकपच्या बाद फेरीत गाशा गुंडळला आहे. ते पाचव्यांदा सेमी फायनल हरले आहेत.

दक्षिण अफ्रिकेची वर्ल्डकपमधील बाद फेरीतील कामगिरी

  • 1992 - सेमी फायनल - इंग्लंड - 19 धावांनी पराभव

  • 1996 - क्वार्टर फायनल - वेस्ट इंडीज - 19 धावांनी पराभव

  • 1999 - सेमी फायनल - ऑस्ट्रेलिया - टाय

  • 2007 - सेमी फायनल - ऑस्ट्रेलिया - 7 विकेट्सनी पराभव

  • 2011 - क्वार्टर फायनल - न्यूझीलंड - 49 धावांनी पराभव

  • 2015 - क्वार्टर फायनल - श्रीलंका - 9 विकेट्सनी पराभव

  • 2015 - सेमी फायनल - न्यूझीलंड - 4 विकेट्सनी पराभव

  • 2023 - सेमी फायनल - ऑस्ट्रेलिया - 3 विकेट्सनी पराभव

दक्षिण अफ्रिकेने आतापर्यंत एकदाही वनडे वर्ल्डकपची फायनल खेळलेली नाही. 1992 च्या वर्ल्डकपध्ये ते सेमी फायनलमध्ये पोहचले होते. मात्र त्यांना इंग्लंडकडून 19 धावांनी पराभव सहन करावा लागला.

त्यानंतर 1999 मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या त्यांचा सेमी फायनल सामना टाय झाला होता. डोनाल्ड विजयासाठई 1 धाव हवी असताना धावबाद झाला. ऑस्ट्रेलिया सुपर सिक्समधील सरस स्थानामुळे फायनलमध्ये पोहचला होती.

यानंतर 2007 च्या वर्ल्डकपमध्ये देखील दक्षिण अफ्रिकेचा ऑस्ट्रेलियानेच सेमी फायनलमध्ये 7 विकेट्सनी पराभव केला होता. 2015 मध्ये ते न्यूझीलंडकडून 4 विकेट्सनी हरले होते. तर आता 2023 मध्ये पुन्हा ते ऑस्ट्रेलियाकडून सेमी फायनल हरले आहेत.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com