World Cup 2019 : प्रतिकुल परिस्थितीत आफ्रिकेच्या 241 धावा 

वृत्तसंस्था
बुधवार, 19 जून 2019

 वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम: विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतले आव्हान टिकवण्यासाठी झडगत असलेल्या दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 241 अशी मजल मारली. सामना सुरु होण्याअगोदर झालेल्या पावसामुळे ही लढत प्रत्येकी 49 षटकांची करण्यात आली. 

 वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम: विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतले आव्हान टिकवण्यासाठी झडगत असलेल्या दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 241 अशी मजल मारली. सामना सुरु होण्याअगोदर झालेल्या पावसामुळे ही लढत प्रत्येकी 49 षटकांची करण्यात आली. 

सकाळी पडलेला पाऊस तसेच ढगाळ वातावरण अशा प्रतिकुल परिस्थितीत प्रथम फलंदाजी करण्याची वेळ आलेल्या आणि मुळातच फलंदाजीत सूर हरपलेल्या दक्षिण आफ्रिकेने पूर्ण षटके खेळण्याचे ध्येय राखले या दरम्यान त्यांनी धावांच्या गतीचा विचार केला नाही. सुरुवातीला हाशिम आमला आणि त्यानंतर रासी वॅन डर दुसेन्‌ यानी झळकावलेली अर्धशतके आफ्रिकेला सव्वादोशच्या पुढे नेणारी ठरली. 

दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला शंभरच्या स्ट्राईर रेटने फलंदाजी करता आली नाही. अपवाद दुसेन्‌चा पण त्यानेही अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळे त्याला 64 चेंडूत नाबाद 67 धावा करता आल्या. दुसऱ्याच षटकांत फॉर्मात असलेला एकमेव फलंदाज डिकॉकची यष्टी बोल्टने उडवल्यावर आफ्रिकेच्या फलंदाजांनी अधिकच सावध पवित्रा घेतला. एक बाजू सांभाळण्याची जबाबदारी हाशिम आमलाने स्वीकारली त्याने कर्णधार डुप्लेसीसह दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर मार्करमसह अर्धशतकी भागीदारी करून आमला 55 धावांवर बाद झाला या खेळीत त्याला अवघे चारच चौकार मारता आले. 

चार बाद 136 या अवस्थेनंतर दुसेन्‌ आणि डेव्हिड मिलर यांनी 74 चेंडूत 72 धावांची भागीदारी केली. पण त्यातील 67 चेंडूंपर्यंत त्यांना एकही चौकार किंवा षटकार मारता आला नव्हता. ही कोंडी दुसेन्‌ने षटकार मारून फोडली लगेचच मिलरने दोन चौकार मारले पण त्यानंतर तोही बाद झाला. त्यानंतर दुसेन्‌ने धावांचा वेग वाढवण्याची जबाबदारी स्वीकारली.
 
संक्षिप्त धावफलक ः 49 षटकांत 6 बाद 241 (हाशिम आमला 55 -83 चेंडू, 4 चौकार, फाफ डुप्लेसी 23 -35 चेंडू, 4 चौकार, मार्करम 38 -55 चेंडू, 4 चौकार, रासी वॅन डर दुसेन्‌ नाबाद 67 - 64 चेंडू, 2 चौकार, 3 षटकार, डेव्हिड मिलर 36 -37 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, ट्रेंट बोल्ड 10-0-63-1, फर्ग्युसन 10-0-59-3)  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: South Africa scores 241 in critical conditions against New Zealand