SA vs IND 1st ODI Playing 11 : नव्या मॅच फिनिशरचं पदार्पण पक्के मात्र चहल - कुलदीपमध्ये स्थानासाठी असेल चुरस

SA vs IND 1st ODI Playing 11
SA vs IND 1st ODI Playing 11esakal

SA vs IND 1st ODI Playing 11 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी 20 मालिका 1 - 1 अशी बरोबरीत सुटली. आता 17 डिसेंबरपासून तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होत आहे. वनडे वर्ल्डकपच्या फायनलनंतर भारतीय संघ पहिल्यांदाच वनडे सामना खेळत आहे.

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यात नव्या पिढीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. भारताचा तरूण संघ केएल राहुलच्या नेतृत्वाखाली तगड्या आफ्रिकेला आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे. टी 20 वर्ल्डकप अवघ्या 6 महिन्यांवर आला असताना या वनडे मालिकेच्या आयोजनावारून टीका देखील होत आहे.

SA vs IND 1st ODI Playing 11
KL Rahul : मला आनंदच होईल... केएल राहुलच्या एका वक्तव्यानं ऋषभ पंतची झोप उडवली

विराट कोहली, रोहित शर्माने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत तरूण खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची चांगली संधी मिळाली आहे. केएल राहुलला याच युवा खेळाडूंमधून पहिल्या वनडे सामन्यासाठी प्लेईंग 11 तयार करायची आहे.

सलामीला ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संजू सॅमसन हा तिसऱ्या क्रमांकावर तर श्रेयस अय्यर चौथ्या आणि केएल राहुल पाचव्या क्रमांकावर फंलदाजीला येऊ शकतो. सहाव्या क्रमांकावर भारताचा नवा मॅच फिनिशर रिंकू सिंहला वनडे पदार्पणाची संधी मिळू शकते.

रिंकूने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी 20 मालिकेत आपली छाप सोडली आङे. आता तो वनडेमध्ये धमाका करण्यास सज्ज झाला आहे.

SA vs IND 1st ODI Playing 11
CSK Reaction On Rohit Sharma : चेन्नईनं रोहितसाठी केलं ट्विट, रितिकानं दिलेली प्रतिक्रिया सांगून गेली सर्व काही

गोलंदाजीबाबत बोलायचं झालं तर या मालिकेत बुमराह, शमी आणि सिराज हे वरिष्ठ वेगवान गोलंदाज खेळत नाहीयेत. बुमराह आणि सिराज कसोटी मालिकेत खेळतील तर शमी फिट नसल्याने मालिकेला मुकला आहे. त्यामुळे भारताच्या वेगवान माऱ्याची जबबादारी आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग यांच्या खांद्यावर असणार आहे.

फिरकीपटूंमध्ये कुलचामध्ये चांगलीच चुरस असणार आहे. कुलदीप यादवने तिसऱ्या टी 20 सामन्यात पाच विकेट्स घेत मोठा धमाका केला आहे. आता त्याला डावलून युझवेंद्र चहलला संधी देण्याची शक्यता कमी आहे.

भारताची संभाव्य प्लेईंग 11 :

ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार), रिंकू सिंह, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com