SA vs IND 2nd ODI : दक्षिण आफ्रिकेची मालिकेत बरोबरी; दुसऱ्या सामन्यात भारताचा 8 विकेट्सनी केला पराभव

SA vs IND 2nd ODI
SA vs IND 2nd ODIesakal

South Africa Vs India 2nd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात यजमानांनी भारताचा 8 विकेट्सनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने सर्वबाद 211 धावा केल्या होत्या. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेने 2 विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं. आफ्रिकेने दुसरा सामना जिंकल्याने मालिका 1 - 1 अशी बरोबरीत आला आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर टोनी झॉर्जीने सर्वाधिक 119 धावा केल्या. त्याने सलामीवीर रीझा हेंड्रिक्स सोबत 130 धावांची सलामी दिली. हेंड्रिक्सने 81 चेंडूत 52 धावा केल्या.

तत्पूर्वी, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या सामन्यात भारताचा डाव 211 धावात संपुष्टात आला. साई सुदर्शनने सलग दुसरे अर्धशतक ठोकत 62 धावा केल्या तर कर्णधार केएल राहुलने 56 धावांचे योगदान दिलं.

दक्षिण आफ्रिकेकडून नांद्रे बर्जरने तीन विकेट्स घेतल्या तर बेउरन हेंड्रिक्स आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली.

114-0 (23.4 Ov) : दक्षिण आफ्रिकेची सामन्यावर पकड

भारताचे 211 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या सलामी जोडीने नाबाद शतकी सलामी दिली. टोनी डे झोर्जी आणि रिझा हेंड्रिक्सने अर्धशतक ठोकले.

211-10 (46.2 Ov) : भारताचा डाव 211 धावात संपुष्टात

दक्षिण आफ्रिकेने भारताला 211 धावात गुंडाळले.

भारताच्या 200 धावा 

भारताचा कर्णधार केएल राहुलने 56 धावांची खेळी केली. मात्र मधल्या फळीतील इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. भारताचे 8 फलंदाज बाद झाले असताना भारताच्या 200 धावा पूर्ण केल्या. अर्शदीप सिंग आणि आवेश खान किल्ला लढवत आहेत.

113-2 (25.4 Ov) : साई सुदर्शनचे सलग दुसरे अर्धशतक

साई सुदर्शनने दक्षिण आफ्रिकेत वनडे क्रिकेटमध्ये सलग दुसरे अर्धशतक ठोकले. त्याने पहिल्या सामन्यात 55 धावांची खेळी केली होती. आता त्याने नाबाद 62 धावा करत संघाला शतकी मजल मारून दिली.

IND 16/1 (4.3) : दक्षिण आफ्रिकेची दमदार सुरूवात 

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने भारतीय फलंदाजांना चांगलेच बांधून ठेवले. ऋतुराज गायकवाड 4 धावा करून बाद झाल्यानंतर साई सुदर्शन आणि तिलक वर्मा यांनी सावध फलंदाजी केली. भारताच्या 5 षटकात फक्त 17 धावा झाल्या.

रिंकू सिंह करणार वनडे पदार्पण 

श्रेयस अय्यर कसोटी संघाशी जोडला जाणार आहे. त्यामुळे त्याच्या ऐवजी रिंकू सिंह वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com