यश तलवार निकाल! मुंबईकर शार्दुलच्या फटकेजीवर प्रितीचा पंजाब फिदा |Shardul Thakur Latest News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shardul Thakur Latest News

यश तलवार निकाल! मुंबईकर शार्दुलच्या फटकेजीवर प्रितीचा पंजाब फिदा

South Africa vs India, 2nd Test, Shardul Thakur Latest News : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मुंबईकर शार्दुल ठाकूरनं बॉलिंगनंतर बॅटिंगमध्येही धमक दाखवली. भारतीय संघाचा दुसऱ्या डावात त्याने 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 24 चेंडूत 28 धावांची उपयुक्त खेळी केली. त्याची ही छोटीखानी खेळी टीम इंडियासाठी खूपच उपयुक्त अशी आहे. चौथ्या डावात त्याचे महत्त्व आपल्याला लक्षात येईल.

दक्षिण आफ्रिकेच्या भेदक माऱ्यासमोर शार्दुल ठाकूरनं जो जज्बा दाखवला तो कमालीचा होता. त्याच्या बॅटिंगवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यात आयपीएलमधील पंजाब किंग्ज संघाचाही समावेश आहे. पंजाब किंग्जच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक खास ट्विट करण्यात आले आहेत. पंजाबने कपिल पाजीं आणि 1983 वर्ल्ड कप विजेत्या हिरोंच्या इतिहासाला उजाळा देणाऱ्या चित्रपटातील एका सीनचा फोटो शेअर केलाय. या फोटोत कपिल पाजींची भूमिका साकारणारा रणवीर सिंह दिसतो. यश तलवार निकाल, असं कॅप्शनही या ट्विटला देण्यात आले आहे.

हेही वाचा: RSA vs IND: शार्दुलचा दांडपट्टा; भारत मोठ्या आघाडीकडे

काय आहे यश तलवार निकालमागचा अर्थ?

1983 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाच्या विजयात अष्टपैलू कपिल पाजींचा मोठा वाटा होता. झिम्बाब्वे विरुद्ध त्यांनी 'करो वा मरो'च्या लढतीत 183 धावांची खेळी केली होती. या बीबीसीच्या संपामुळे या सामन्याचे व्हिडिओ फुटेजस नाहीत. 83 चित्रपटातून कपिल पाजींची ही ऐतिहासिक खेळी दाखवली आहे. त्याखेळीत कपिल पाजींनी मूंगस बॅट वापरुन झिम्बाब्वेची धुलाई केली होती. चित्रपटात ही स्टोरीची झलक दाखवताना रणवीरचा एक डायलॉग आहे. त्यात यश (यशपाल शर्मा) तलवार निकाल, असे म्हणत रणवीर कपूर (कपिल देव) बॅट बदलून मैदानात उतरल्याचे दाखवण्यात आले आहे. पंजाबने शार्दुलसंदर्भात केलेले ट्विट हे भारताला एक चांगला अष्टपैलू मिळाल्याचे संकेत देणारा असाच आहे.

हेही वाचा: पुजारामुळे १०० वर्षाच्या क्रिकेट इतिहासात 'असे' दुसऱ्यांदाच घडले

शार्दुल ठाकूरची अष्टपैलू कामगिरी

शार्दुल ठाकूरनं पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या सात गड्यांना बाद करत आपल्या गोलंदाजीतील धार दाखवून दिली होती. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच अक्षरश: कंबरडे मोडलं. त्यानंतर मोक्याच्या क्षणी त्याने फलंदाजीतही धमाका करुन दाखला. अष्टपैलूत्वाची झलकच त्याने जोहान्सबर्ग मैदानात दाखवून दिली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top