SA vs IND 3rd ODI Playing 11 : केएल मालिका विजयासाठी लावणार जोर; तिलक वर्माला वगळणार?

SA vs IND 3rd ODI Playing 11
SA vs IND 3rd ODI Playing 11esakal

SA vs IND 3rd ODI Playing 11 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वनडे सामना हा बोलँड पार्क पार्लवर होत आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा आठ विकेट्सनी पराभव करत मालिकेत 1 - 1 अशी बरोबरी केली. त्यामुळे तिसऱ्या सामन्यावर मालिकेचा विजेता ठरणार आहे.

तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. यातील प्रमुख बदल म्हणजे तिलक वर्माच्या ऐवजी संघात रजत पाटीदारला संधी मिळू शकते.

SA vs IND 3rd ODI Playing 11
Hardik Pandya : हार्दिकसोबतची जोडी फुटल्यानंतर आशिष नेहराची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला...

तिलक वर्माला वगळणार?

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर डावखुरा फलंदाज तिलक वर्माने निराशा केला आहे. त्याला संधी मिळून देखील मोठी खेळी करता आलेली नाही. तिलक वर्माने वनडे आणि टी 20 मालिकेत मिळून 4 सामन्यात फक्त 40 धावा केल्या आहेत. आता मालिका जिंकण्यासाठी तिसरा सामना महत्वाचा आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन या सामन्यात रजत पाटीदारला प्लेईंग 11 मध्ये सामील करू शकते.

तिलक वर्मासोबतच ऋतुराज गायकवाड देखील चांगली कामगिरी करू शकलेला नाही. मात्र तो संघातील आपली जागा कायम ठेवेल कारण त्याला दुसरा पर्यायच नाहीये. संजू सॅमसन फलंदाजीत फेल गेला आहे. मात्र त्याच्या देखील स्थानाला धोका नाहीये.

जर संघात बदल झालाच तर तो तिलक वर्माच्या जागेवर होऊ शकतो. तिलकच्या ऐवजी रजत पटीदारला तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळू शकते. रजत सहसा मधल्या फळीत फलंदाजी करतो. अशा परिस्थितीत संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो आणि रजत खालच्या फळीत फलंदाजी करू शकतो.

SA vs IND 3rd ODI Playing 11
ICC ODI Ranking : प्रिन्स गिलला धक्का, पाकिस्तानच्या माजी कर्णधार रँकिंगमध्ये अव्वल स्थानी

भारताची संभाव्य प्लेईंग 11 :

 • ऋतुराज गायकवाड

 • साई सुदर्शन

 • संजू सॅमसन

 • केएल राहुल

 • रजत पाटीदार

 • रिंकू सिंह

 • अक्षर पटेल

 • कुलदीप यादव / युझवेंद्र चहल

 • अर्शदीप सिंग

 • आवेश खान

 • मुकेश कुमार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com