WTC 23 Points Table : टीम इंडियाला फटका, आफ्रिकेची झेप! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ICC World Test Championship (2021-2023) Latest Points Table

या गुणतालिकेत श्रीलंकेचा संघ एका मालिकेतील 2 पैकी 2 सामन्यातील विजयासह अव्वलस्थानावर विराजमान आहे.

WTC 23 Points Table : टीम इंडियाला फटका, आफ्रिकेची झेप!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) पराभवाचा टीम इंडियाने (Team India) मालिका तर गमावली. याशिवाय आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) गुणतालिकेतही संघाला फटका बसला आहे. दक्षिण आफ्रिकेनं मालिका 2-1 अशी खिशात घालत गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतलीये. या गुणतालिकेत श्रीलंकेचा संघ एका मालिकेतील 2 पैकी 2 सामन्यातील विजयासह अव्वलस्थानावर विराजमान आहे. त्यांच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा नंबर लागतो. (ICC World Test Championship (2021-2023) Latest Points Table)

घरच्या मैदानात इंग्लंड (England) विरुद्धच्या अ‍ॅशेस मालिकेत (Ashes) त्यांनी दमदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाने (Australia) 83.33 पर्सेंटेजसह 40 गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत. पाकिस्तानच्या (Pakistan) संघाने 75 विनिंग पर्सेंटेजसह 36 गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकवला आहे. भारतीय संघाविरुद्धच्या धमाकेदार विजयानंतर आफ्रिकेनं चौथ्या स्थानावर कब्जा केला आहे. त्यांनी 66.66 विनिंग पर्सेंटेजसह 24 गुण जमा आहेत. भारतीय संघाच्या खात्यात इतर संघाच्या तुलनेत सर्वाधिक 53 गुणांची नोंद आहे. पण विनिंग पर्सेंटेज 49.07 असल्यामुळे ते पाचव्या स्थानावर आहेत.

हेही वाचा: SA vs IND, 3rd Test: 30 वर्षे, 7 कर्णधार... पण पुन्हा आफ्रिकेत मात

पहिली वहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकणारा न्यूझीलंडचा संघ 33.33 विनिंग पर्सेंटेजसह 16 गुण मिळवत सहाव्या स्थानावर आहे. बांगलादेशने न्यूझीलंडला घरच्या मैदानात विजयी सलामी दिली. पण त्यांना दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. परिणामी ते 25 विनिंग पर्सेंटेजसह 12 गुण मिळवत सातव्या. वेस्ट इंडिज सेम कॅलक्युलेशसह आठव्या आणि इंग्लंड तळाला आहे. इंग्लंडच्या खात्यात 10.41 च्या विनिंग पर्सेंटेजसह केवळ 10 गुण कमावले आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top