FIFA WC22 : पराभवानंतरही पोर्तुगालने उपउपांत्यपूर्व फेरीत मारली धडक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fifa world cup 2022 South Korea vs Portugal football marathi news

FIFA WC22 : पराभवानंतरही पोर्तुगालने उपउपांत्यपूर्व फेरीत मारली धडक!

FIFA World Cup 2022 South Korea vs Portugal : सुपर सब (बदली) खेळाडू इंग हीचन याच्या भरपाई वेळेत केलेल्या गोलने कमाल केली. या गोलच्या बळावर दक्षिण कोरियाने बलाढ्य पोर्तुगालला २-१ फरकाने नमवून विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेची बाद फेरी गाठली..

एज्युकेशन सिटी स्टेडियमवर दक्षिण कोरियाच्या हँग हीचॅन याने । ९०+१व्या मिनिटास संधी साधली. त्यामुळे घानावर विजय नोंदवूनही उरुग्वेला परतीचे तिकीट काढावे लागले. 'ह' गटात विजयामुळे दक्षिण कोरिया व उरुग्वेचे समान चार गुण झाले. दक्षिण कोरियास दुसरा क्रमांक मिळाला, तर उरुग्वे संघ तिसऱ्या स्थानी राहिला. दोन विजय व एका पराभवासह पोर्तुगाल संघ सहा गुणांसह गटात अव्वल ठरला. दक्षिण कोरिया व उरुग्वेचा गोलफरक समान शून्य राहिला, त्यात दक्षिण कोरियाने चार गोल नोंदविले, तर उरुवेला दोन गोल करता आले. या कारणास्तव आशियाई संघाला आगेकूच राखता आली हे विशेष.

सामन्याच्या नव्वदाव्या गोलबरोबरी मिनिटापर्यंत १-१ होती. यावेळी दक्षिण कोरियाचा संघ स्पर्धेबाहेर जाणार असेच चित्र होते. कारण त्यांना पुढील फेरीसाठी विजय अत्यावश्यक होता. मात्र हीचन याच्या गोलने सामन्याचे पारडे बदलले, तो सामन्याच्या ६५व्या मिनिटास मैदानात उतरला होता. त्यापूर्वी रिकाडों होती याच्या पाचव्या मिनिटाच्या गोलमुळे पोर्तुगालने आघाडी घेतली होती, तर किम यंगवॉन याने दक्षिण कोरियास २७व्या मिनिटास बरोबरी साधून दिली.

दुसऱ्यांदा पोर्तुगालवर मात

दक्षिण कोरियाने विश्वकरंडक फुटबॉलमध्ये दुसऱ्यांदा पोर्तुगालला हरविले. यापूर्वी २००२ मधील स्पर्धेत त्यांनी युरोपियन प्रतिस्पध्यांवर १-० फरकाने मात केली होती.

दक्षिण कोरियाची तिसऱ्यांदा बाद

दक्षिण कोरियाने विश्वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात तिसऱ्यांदा बाद फेरी गाठली. २००२ मध्ये त्यांनी उपांत्य फेरी गाठत चौथा क्रमांक मिळविला होता. २०१० मध्ये त्यांचे आव्हान राऊंड ऑफ १६ फेरीत संपुष्टात आले होते.

विजय नोंदवूनही उरुग्वे स्पर्धेबाहेर

जॉर्जन डी अरास्काएटा याने पूर्वार्धात सहा मिनिटांत दोन गोल केले. त्या बळावर माजी विजेत्या उरुग्वेने घानाला २-० फरकाने हरविले, पण हा निकाल त्यांना विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत नेण्यास पुरेसा ठरला नाही. दक्षिण कोरिया व उरुग्वे यांचे समान चार गुण झाले. दक्षिण 'कोरियाने पोर्तुगालनंतर गटात दुसरा क्रमांक प्राप्त केला. उरुग्वेने सामना ३० फरकाने जिंकला असता, तर १ गोलसरासरीने त्यांना पुढील फेरी गाठता आली असती.