

Spain vs Argentina FIFA World Cup 2026 Final
Spain win FIFA World Cup 2026 after beating Argentina Marathi News: स्पेनने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनावर विजय मिळवला. आपल्या मजबूत बचावासाठी ओळखल्या जाणाऱ्या स्पेनने गतविजेत्यांना १२० मिनिटांच्या खेळात जखडून ठेवले होते.. लिओनेल मेस्सीचे ( Lionel Messi) अस्तित्व या सामन्यात त्यांना जाणवू दिले नाही, एवढा सुरेख खेळ त्यांच्याकडून झाला. ९०+२ मिनिटाला इंझो फर्नांडेझला लाल कार्डमुळे मैदानाबाहेर जावे लागले आणि अर्जेंटिनाला १० खेळाडूंसह पुढील ३० मिनिटे संघर्ष करावा लागला. २० प्रयत्नांनंतर स्पेनला १०६ व्या मिनिटाला गोल करण्यात यश मिळाले... फेरान टोरेसने ( Ferran TORRES) भन्नाट गोल करून स्पेनचा विजय पक्का केला.