FIFA WORLD CUP 2026 PRIZE MONEY: ४,८१,४०,००,०००! स्पेनने विजेतेपदाच्या ट्रॉफीसह जिंकली बक्कळ रक्कम; अर्जेंटिनाला किती बक्षीस मिळाले वाचा... जाणून घ्या वर्ल्ड कप विजेत्यांची यादी

FIFA World Cup 2026 prize money winners and runners-up : फिफा वर्ल्ड कप २०२६ जिंकत स्पेनने केवळ सुवर्ण ट्रॉफीच उंचावली नाही, तर विक्रमी बक्षीस रक्कमही आपल्या नावावर केली. अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा १-० असा पराभव केला.
Spain vs Argentina FIFA World Cup 2026 Final

Spain vs Argentina FIFA World Cup 2026 Final

Updated on

FIFA World Cup 2026 total prize pool explained: स्पेनने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ फायनलमध्ये गतविजेत्या अर्जेंटिनाचे वस्त्रहरण केले. १२० मिनिटांच्या खेळात स्पेनने लिओनेल मेस्सीसारख्या ( Lionel Messi) जगातील सर्वोत्तम खेळाडू असलेल्या संघाला गोल करण्याच्या केवळ दोन संधी निर्माण करू दिल्या. तेच स्पेनने १२ ऑन टार्गेट प्रयत्नांसह गोलसाठी २० संधी निर्माण केल्या. १०६ व्या मिनिटाला फेरान टोरेस ( Ferran Torres) ने केलेला गोल स्पेनच्या विजयासाठी पुरेसा ठरला. २०१० नंतर स्पेनने वर्ल्ड कप उंचावला आणि अर्जेंटिनाचे सलग दुसरे जेतेपद पटकावण्याच्या स्वप्नांचा चुराडा केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com