Spain vs Belgium FIFA World Cup 2026 Quarterfinal Result
esakal
Spain vs Belgium FIFA World Cup 2026 Quarterfinal Result: २०१० मध्ये वर्ल्ड कप उंचावणाऱ्या स्पेनला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नव्हती, परंतु यंदा त्यांनी फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. ८८ व्या मिनिटाला मिकेल मेरिनोच्या गोलने स्पेनला बेल्जियमवर २-१ असा विजय मिळवून दिला. याच मेरिनोने पोर्तुगालविरुद्ध ९०+१ मिनिटाला गोल करून स्पेनला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचवले होते आणि आज त्याने बेल्जियमला बाद केले. वर्ल्ड कपच्या संपूर्ण इतिहासात, दोन बाद फेरीच्या सामन्यांच्या शेवटच्या ५ मिनिटांत दोन विजयी गोल करणारा तो एकमेव खेळाडू आहे.