ठाणे : षटकार ठोकून टीमला जिंकवून देत त्याने सोडले प्राण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sport news cricket ground Sanjay Govind Thackeray hit sixer and passed away due heart attack thane

ठाणे : षटकार ठोकून टीमला जिंकवून देत त्याने सोडले प्राण

वज्रेश्वरी : क्रिकेटच्या मैदानात षटकार ठोकत आपल्या टिमला विजय मिळवून देणार्‍या खेळाडूच दुर्दैवी निधन अंबाडीत झाले. संजय गोविंद ठाकरे असे त्या हरहुन्नरी खेळाडूचे नाव असून ते अंबाडी ग्रामपंचायतीचे सदस्य होते.

भिवंडी तालुक्यातील घोटगाव येथे 45 वर्षांवरील खेळाडूसाठी आयोजित केलेल्या स्पर्धेत खेळण्यासाठी ते गेले होते. ते गुड मॉर्निंग या संघाकडून खेळत होते. सदर खेळात ते खेळत असलेल्या गुड मॉर्निंग टीमला जिंकण्यासाठी शेवटच्या ओवर मध्ये 2 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता होती ती आवश्यकता होती सजय ठाकरे यानी जोरदार षटकार ठोकत आपल्या टिमला विजय मिळवून दिला.

मात्र त्याच क्षणी त्याच्या छातीत दुखू लागले असता ते तडक अंबाडी येथील राजमाता रूग्णालयात गेले. मात्र तेथे पोहोचले असता दाखल होण्याआगोदरच त्याच्यावर काळाने झडप घातली व त्याचा दुर्दैवी मुत्यू झाला.संजय ठाकरे याच्या अकाली निधनाने अंबाडी पंचक्रोशीत शोककळा पसरली असून त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी आणि मुले असा परिवार आहे.

Web Title: Sport News Cricket Ground Sanjay Govind Thackeray Hit Sixer And Passed Away Due Heart Attack Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top