ॲडम पिटीचा ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात विश्‍वविक्रम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

बुडापेस्ट - ब्रिटनच्या ॲडम पिटी याने पुरुषांच्या ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात मंगळवारी जागतिक विक्रमाची नव्याने नोंद केली. जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत त्याने २६.१० सेकंद अशा विक्रमी वेळेत शर्यत जिंकली.

बुडापेस्ट - ब्रिटनच्या ॲडम पिटी याने पुरुषांच्या ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात मंगळवारी जागतिक विक्रमाची नव्याने नोंद केली. जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत त्याने २६.१० सेकंद अशा विक्रमी वेळेत शर्यत जिंकली.

ब्रिटनच्या २२ वर्षीय ॲडमने दोन वर्षांपूर्वी नोंदवलेला आपलाच २६.४२ सेकंदांचा विक्रम मोडीत काढला. पिटीने सोमवारी १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक शर्यत जिंकताना आज सकाळी त्याने पात्रता फेरीतच विश्‍व विक्रमी वेळेची नोंद करत उपांत्य फेरी गाठली. त्याने तिसऱ्यांदा जागतिक विक्रम मोडला. अंतिम फेरीत त्याच्यासमोर कॅमेरॉन व्हॅन डर बुर्घ याचे आव्हान असेल. तो पात्रता शर्यतीत पिटीपेक्षा केवळ शतांश ४४ सेकंदांने मागे राहिला होता. 

महिलांच्या १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात स्वीडनच्या सारा स्योस्ट्रॉम हिने ५५.५३ सेकंद अशी वेश देत सर्धा विक्रमासह सुवर्णपदक मिळविले. तिचे जागतिक स्पर्धेतील नववे पदक ठरले. तिने प्रथम २००९ मध्ये पदक जिंकले होते. पुरुषांच्या ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात ब्रिटनच्या बेंजामिन प्राउड याने २२.७५ सेकंद वेळेसह जागतिक स्तरावरील आपले पहिले पदक मिळविले. रिओ ऑलिंपिक स्पर्धेत तो चौथ्या स्थानावर आला होता. 

महिलांची २०० मीटर वैयक्तिक मिडले शर्यत हंगेरीच्या कॅटिन्का होस्झू हिने २ मिनिट ०७ सेकंद वेळेत जिंकली. जागतिक स्पर्धेत या स्पर्धा प्रकारात सलग तिसरे सुवर्णपदक मिळविणारी ती पहिलीच जलतरणपटू ठरली. तिने यापूर्वी २०१३ आणि २०१५ मध्ये देखील ही शर्यत जिंकली होती. रिओ ऑलिंपिक स्पर्धेत तिने तीन सुवर्णपदके मिळविली होती. कारकिर्दीमधील तिचे हे सहावे सुवर्णपदक ठरले.

Web Title: sports news adam peaty world record in breaststroke