भारतासमोर आज किर्गिझस्तानचे आव्हान

पीटीआय
मंगळवार, 13 जून 2017

बंगळूर - आंतरराष्ट्रीय मित्रत्वाच्या सामन्यात भारतीय संघाने सलग सात विजय मिळविले असले, तरी उद्या मंगळवारी एएफसी आशियाई करंडक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीतील सामन्यात त्यांच्यासमोर किर्गिझस्तानचे आव्हान असेल.

भारतीय संघाच्या कामगिरीत अलीकडच्या सामन्यात सातत्य दिसून आले आहे. जागतिक क्रमवारीत त्यांचे स्थान प्रतिस्पर्धीपेक्षा ३२ स्थानांनी खाली आहे. 

त्यामुळे उद्या लढतीला सुरवात होताना मानसिकदृष्ट्या भारतीय संघावर याचा परिणाम होईल का ? हा मुद्दा प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टटाईन यांनी खोडून काढला. ते म्हणाले, ‘‘सामना कुठलाही असला, तरी. मानांकन सामन्याचा निकाल ठरवत नसते. त्यासाठी सामन्याच्या दिवशी तुमचा खेळ चांगला होणे आवश्‍यक असते.’’

सामन्यातील आव्हानविषयी कॉन्स्टटाईन म्हणाले, ‘‘आमची तयारी चांगली असली, तरी आम्ही प्रतिस्पर्ध्याचा आदर करतो. किर्गिझस्तान अनुभवी संघ आहे. त्यांच्याकडे गुणवान खेळाडूंची कमतरता नाही. विशेष म्हणजे त्यांचे बहुतेक खेळाडू युरोपमध्ये खेळतात. त्यांच्याकडून आम्हाला चांगली लढत मिळेल. मोठ्या स्पर्धेसाठी पात्रता फेरीचा सामना असल्यामुळे आमच्यासमोर नक्कीच एक तुल्यबळ आव्हान आहे.’’

आम्हीच संभाव्य विजेते
किर्गिझस्तानचे प्रशिक्षक ॲलेक्‍झांडर क्रेस्टनिन यांनी उद्या सामन्यात आम्हीच संभाव्य विजेते असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘गटात आम्हीच संभाव्य विजेते आहोत. आम्ही येथे जिंकण्यासाठी आलो आहोत. बरोबरीवर आम्ही समाधान मानणार नाही. भारतीय संघ सध्या चांगला खेळ करत आहे. त्यांचा बचाव भेदण्याचे आव्हान आमच्यासमोर असेल.’’

Web Title: sports news AFC Asian Football Trophy