कोल्हापूरच्या ध्रुवचा भारदस्त विजय

मुकुंद पोतदार
सोमवार, 24 जुलै 2017

पहिल्यावहिल्या जेतेपदासह गुणतक्‍त्यात दुसरा

श्रीपेरंबुदूर - कोल्हापूरच्या ध्रुव मोहितने राष्ट्रीय रेसिंग मालिकेतील ॲमीओ करंडक स्पर्धेत पदार्पणातील प्रभावी यशोमालिका उंचावली. पहिल्या फेरीतील तिसऱ्या क्रमांकानंतर त्याने दुसऱ्या फेरीतील शर्यतीत भारदस्त विजय मिळविला. कारकिर्दीतील पहिल्यावहिल्या विजेतेपदासह ध्रुवने गुणतक्‍त्यात दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.

मद्रास मोटर स्पोर्टस क्‍लबच्या ट्रॅकवर ध्रुवने तिसऱ्या क्रमांकावरून शर्यत सुरू केली. त्याने अचूक स्टार्ट केली. गोव्याच्या किथ डिसूझाने पहिल्याच कॉर्नरला पोल पोझिशनवरील रोहित गोयलला ओव्हरटेक केले. दुसरीकडे ध्रुवने वेग वाढवित या दोघांना मागे टाकत आघाडी घेतली. मग वेगवान; पण नियंत्रित ड्रायव्हिंग करीत त्याने फेरीगणिक आघाडी वाढवित नेली. 

दुसऱ्या क्रमांकासाठी करमिंदर सिंग आणि दक्षिण आफ्रिकेचा डेव्हीन रॉबर्टसन यांच्यात जोरदार चुरस होती. अनुभवाने सरस करमिंदर आणि दर्जाने सरस डेव्हिन या दोघांपैकी कुणालाही ध्रुवने संधी दिली नाही. त्याने १५ मिनीट ५२.२१९ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली. करमिंदरला त्याने सात सेकंदांपेक्षा जास्त वेळेने मागे टाकले. डेव्हिनची वेळ  १६ मिनिट ०१.०४५  सेकंद होती.

ध्रुवने शनिवारच्या शर्यतीत पाचवा क्रमांक मिळविला होता. त्याला  गुण मिळाले होते. विजयासह त्याने ३६ गुणांची कमाई केली. पहिल्या फेरीत त्याने पाचव्या व तिसऱ्या क्रमांकासह ६० गुण मिळविले होते. त्याचे एकूण ७६ गुण झाले. 

करमिंदर २१६ गुणांसह आघाडीवर आहे. त्याचा नजीकचा प्रतिस्पर्धी संदीप कुमार याला आधी कार भरकटल्याने आणि नंतर जोहीर सुरेशच्या कारची धडक बसल्यामुळे माघार घ्यावी लागली.

ध्रुवने सांगितले की, मी येथील ट्रॅकवर कारकिर्दीत प्रथमच रेस कार (सलून कार) चालवित होतो. कोईमतूरमधील कामगिरीमुळे माझे मनोधैर्य उंचावले होते. माझा मुळ दृष्टिकोन रेसिंगचे धडे आत्मसात करण्याचा आहे. त्यासाठी मूलभूत गोष्टी अचूक करण्यावर कटाक्ष आहे. त्याचाच फायदा 
झाला.

Web Title: sports news amino karandak competition