फॅबियानो कॅरुआनावर आनंदचा विजय

पीटीआय
मंगळवार, 16 जानेवारी 2018

विक ॲन झी (नेदरलॅंड्‌स) - भारताचा ग्रॅंडमास्टर विश्‍वनाथन आनंद याने टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत अमेरिकेच्या फॅबियानो कॅरुआनाला हरविले. आनंदकडे पांढरी मोहरी होती. पेट्रॉफ बचाव पद्धतीमधील स्टाँटन विविधतेचा डाव त्याने ४१ चालींत जिंकला. कॅरुआनाचे एलो रेटिंग २८११ असून, जागतिक क्रमवारीत तो दुसरा आहे.

या तुलनेत आनंदचे एलो रेटिंग २७६७ असून, तो ११व्या स्थानावर आहे. आनदंचे तीन फेऱ्यांत अडीच गुण झाले. आनंदने दोन विजय व एका बरोबरीसह दहा ‘फिडे’ गुणांची कमाई केली. याबरोबरच त्याने लाईव्ह रेटींगमध्ये पहिल्या १० जणांत स्थान मिळविले. तो आता ९व्या स्थानी आहे. त्याआधी, आनंदला दुसऱ्या फेरीत सर्जी कॅर्जाकीनशी बरोबरी साधावी लागली. भारताचा दुसरा स्पर्धक बी. अधीबान याला मॅग्नस कार्लसन याने हरविले. कार्लसनला अग्रमानांकन आहे. त्याने काळ्या मोहऱ्यांसह विजय मिळविला. आनंद आणि कॅर्जाकीन यांनी ठराविक अंतराने मोहरामोहरी केली. विरुद्ध रंगाचे उंट पटावर उरल्यानंतर त्यांनी गुण वाटून घेतला. 

Web Title: sports news Anand victory