राष्ट्रीय कबडडी संघात दिल्लीच्या कर्णधारपदी अनिल निंबोळकार 

सागर कापसे
मंगळवार, 2 जानेवारी 2018

पातुर्डा फाटा (बुलडाणा) - संग्रामपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात वाननदी काठावर वसलेल्या नेकनामपुच्या अनिल श्रीराम निंबोळकार याची राष्ट्रीय कबडडी संघात दिल्लीच्या कर्णधारपदी निवड झाली. दुर्गम भागतील युवकाला मिळाली संधी मिळाल्याने त्याचे कौतुक होत आहे . 

पातुर्डा फाटा (बुलडाणा) - संग्रामपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात वाननदी काठावर वसलेल्या नेकनामपुच्या अनिल श्रीराम निंबोळकार याची राष्ट्रीय कबडडी संघात दिल्लीच्या कर्णधारपदी निवड झाली. दुर्गम भागतील युवकाला मिळाली संधी मिळाल्याने त्याचे कौतुक होत आहे . 

 नेकनामपुरच्या अनिल श्रीराम निंबोळकार याची तीन वर्षांपूर्वी प्रो लिंग कबडडीमध्ये  दिल्ली संघात सिजन 4 मध्ये निवड झाली होती. त्यावेळी लेफ्ट रेडर म्हणुन दिल्ली दबंग कबडडी तो खेळला. त्याचे प्रदर्शन चांगले राहिले. तेव्हापासून  अनिल निबोंळकार याने कबडडी खेळात  जिल्हयात नव्हे तर राज्यात  आपली वेगळी ओळख व दबदबा निर्माण केला तर सिनियर राष्ट्रीय कबडडी स्पर्धा मध्ये मुंबई, आंध्र. प्रदेश, ओडीसा, अजमेर झारखंड येथे झालेल्या सामन्यात संघाला विजेते पद मिळवुन दिले. इंडो तिबेट पो फोर्स या खात्यात कार्यरत असल्याने दिल्ली  ऑल्मपी मध्ये आपल्या संघाला सुवर्ण पदक मिळवून दिले. सन २०१६ मध्ये ऑल इंडिया पोलीस कबडडी क्रिडा स्पर्धा बिहार राज्यातील पटना येथे झाली तेव्हा इंडो तिबेट फोर्सला सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यामुळेच दिल्ली राष्ट्रीय कबडडी संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी दिली. राज्य कबडडी असोशिएशन चे सचिव निरंजन सिंह यांनी अनिल श्रीराम निबोंळकार याना दिलली राष्ट्रीय कबडडी संघाचे कर्णधार पदावर नियुकतीचे पत्र देऊन अभिनंदन केले . हैद्राबाद येथे होणाऱ्या सिनियर नॅशनल कबडडी स्पर्धा मध्ये ग्रामीण भागातील कबडडी खेळाडु अनिल निबोंळकार संघासाठी २ जानेवारी  खेळणार आहे. नेकनामपूर गावाची लोकसंख्या जेमतेम ३०० आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व  युवकाची घरची परिस्थीती असताना विविध समस्यावर मात करित पदविधर झालेल्या अनिलने कबड्डी खेळात नावलौकिक प्राप्त केला आहे. आपल्या यशाचे श्रेय तो वडिल, भाऊ लखन, मित्र अजय राहाटे यांना देत आहे.

Web Title: sports news anil nimbolkar national kabaddi delhi team captain