आशियाई इनडोअर स्पर्धेत अरपिंदरला तिहेरी उडीत सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

नागपूर - भारताच्या अरपिंदरसिंगने अश्‍गबात (तुर्कमेनिस्तान) येथे आशियाई इनडोअर क्रीडा स्पर्धेत भारताला ॲथलेटिक्‍समधील अखेरचे सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने तिहेरी उडीत हे पदक मिळविले. भारताने पाच सुवर्णपदकांसह आठ पदके मिळवित पदकतालिकेत दुसरे स्थान मिळविले. कझाकिस्तानने सहा सुवर्णपदकांसह दहा पदके मिळवित पदकतालिकेत अव्वल स्थान मिळविले. 

माजी राष्ट्रीय विक्रमवीर व तीन वर्षांपूर्वी ग्लासगो येथे राष्ट्रकुल स्पर्धेत ब्राँझपदक जिंकणाऱ्या अरपिंदरसिंगने १६.२१ मीटर अंतरावर उडी मारीत सुवर्णपदक निश्‍चित केले. भारताचा दुसरा स्पर्धक कार्तिक उन्नीकृष्णनला पाचवे स्थान मिळाले. तो १५.८४ मीटरपर्यंतच मजल मारू शकला. पुरुषांच्या हेप्टथलॉनमध्ये एन. अभिषेक स्पर्धाही पूर्ण करू शकला नाही. बांबू उडीत अपयशी ठरल्यानंतर तो शेवटच्या एक हजार मीटर धावण्याच्या शर्यतीसाठी ट्रॅकवर उतरलाच नाही. दरम्यान महिलांच्या ४-४०० मीटर रिले शर्यतीत कझाकिस्तान संघ अपात्र ठरल्यामुळे थायलंडला सुवर्णपदक मिळाले.

पुरुषांची ४-४०० मीटर रिले शर्यत अतिशय चुरशीची झाली. सुवर्णपदकासाठी कतार आणि पाकिस्तान यांच्यात शेवटपर्यंत चुरस होती. मात्र, पाकिस्तानने सुवर्णपदक जिंकून सर्वांना चकित केले. उंच उडीत आशियाई विजेत्या सीरियाच्या माजद गझलने २ मीटर २६ सेंटिमीटरचा नवीन स्पर्धा विक्रम प्रस्थापित केला. 

भारतीय खेळाडूंनी मिळविलेल्या आठ पदकाबद्दल भारतीय ॲथलेटिक्‍स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी आनंद व्यक्त केला. या खेळाडूंचा मला अभिमान आहे, अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली.

Web Title: sports news asia indoor competition