ॲथलेटिक्‍स मोसमाच्या सुरवातीपासून नन्नाचा पाढा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

मुंबई - भारतीय ॲथलेटिक्‍स मोसमास उद्या (ता. २७) होणाऱ्या पहिल्या इंडियन ग्रा. प्रि. ॲथलेटिक्‍स स्पर्धा शर्यतीने सुरवात होईल; पण या पहिल्याच स्पर्धेतील तीन प्रकार अल्प प्रतिसादामुळे रद्द करण्याची वेळ भारतीय ॲथलेटिक्‍स महासंघावर आली आहे. याशिवाय स्पर्धेच्या प्रतिष्ठित समजल्या जात असलेल्या महिलांच्या ८०० मीटर शर्यतीत दोघीच आहेत. 

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची पात्रता, काही दिवसांवरच आलेली फेडरेशन स्पर्धा यामुळे या पहिल्याच स्पर्धेत चांगल्या कामगिरीची आशा भारतीय ॲथलेटिक्‍स पदाधिकारी बाळगून आहेत. त्यातच परदेशातील सरावामुळे कामगिरी उंचावेल, असेही सांगितले जात आहे. मात्र त्याच वेळी महिलांच्या ‘फेकी’च्या दोन स्पर्धा अल्प प्रतिसादामुळे रद्द करण्याची वेळ आली. महिलांच्या गोळाफेक आणि थाळीफेकबरोबरच पुरुषांची उंची उडी स्पर्धाही रद्द करणे भाग पडले. महिलांच्या तिहेरी उडीत चौघीच आहेत. 

ॲथलेटिक्‍समधील फिल्ड प्रकारात फारसा प्रतिसाद नाही. पुरुषांची गोळाफेक, लांब उडी, थाळीफेकमध्ये; तसेच महिलांच्या भालाफेक आणि लांब उडीत प्रत्येकी सहा स्पर्धकच आहेत. पुरुषांच्या चारशे मीटर अडथळा शर्यतीत सातच स्पर्धक आहेत.

Web Title: sports news athletics season