श्रीकांत, साईप्रणित, सिंधू, साईनाची आगेकूच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

सिडनी - ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत किदांबी श्रीकांत, बी. साईप्रणित, तर महिला एकेरीत सिंधू, साईना नेहवाल यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. 

साईप्रणितने चीनच्या हुआंग युझिआंग याच्यावर २१-१५, १८-२१, २१-१३ असा विजय मिळविला. श्रीकांतने पुन्हा एकदा अव्वल मानांकित सोन वॅन हो याचे आव्हान १५-२१, २१-१३, २१-१३ असे संपुष्टात आणले. सिंधू हिने चीनच्या तेन झिआओझिन हिचे आव्हान २१-१३, २१-१८ असे मोडून काढले. 

श्रीकांत आणि साईप्रणित यांची सुरवात संमिश्र झाली. साईप्रणितने पहिली गेम सहज जिंकली, तर श्रीकांतला प्रतिकार करूनही पहिली गेम गमवावी लागली. तुलनेत दुसऱ्या गेमपासून श्रीकांतचा खेळ बहरला त्याने १६-१० अशा मोठ्या आघाडीनंतर दुसरी गेम सहज जिंकली. तिसऱ्या निर्णायक गेममध्ये मग त्याने प्रतिस्पर्ध्याला संधीही दिली नाही. श्रीकांतचा अव्वल मानांकित सोन ह्याच्यावरील सलग दुसरा विजय ठरला. गेल्याच आठवड्यात त्याने सोनचा पराभव करत इंडोनेशियन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. 

साईप्रणितला दुसऱ्या गेमला सातत्य राखता आले नाही. संघर्षपूर्ण लढतीत त्याने तीन गुणांनी दुसरी गेम गमावली. तिसऱ्या निर्णायक गेमला साईप्रणितने श्रीकांत प्रमाणेच जोरदार खेळ केला. साईनाला सलग दुसऱ्या फेरीत विजयासाठी झगडावे लागले. क्रमवारीत सोळाव्या स्थानावर असणाऱ्या साईनाला या वेळी अमेरिकेच्या नवख्या सोनिआ शेह हिने आव्हान उभे केले. तीन गेमपर्यंत रंगलेली लढत साईनाने अखेरच २१-१५, २०-२२, २१-१४ अशी जिंकली. आता तिची गाठ सहावी मानांकित सून यू हिच्याशी पडणार आहे.

सोन असा प्रतिस्पर्धी आहे की तो जास्त आक्रमण करत नाही. रॅलीजवर त्याचा भर असतो. त्यामुळे त्याच्याविरुद्ध संयमानेच खेळ करावा लागतो. प्रशिक्षण कार्यक्रमात यावरच भर दिला आणि मुख्य म्हणजे माझी शंभर टक्के तंदुरुस्ती. यामुळेच माझा निभाव लागू शकला.
- किदांबी श्रीकांत

Web Title: sports news austrolian open badminton competition