श्रीकांतसमोर प्रणॉय, तर सिंधूला साईनाचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

नागपूर - वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत या वेळी देशातील अव्वल खेळाडूंचा अपेक्षित दबदबा राहिला. विजेतेपदाच्या लढतीत आता किदांबी श्रीकांत समोर एच. एस. प्रणॉयचे आव्हान असेल. महिला विभागात विजेतेपदाच्या चौकारासाठी पुन्हा एकदा सिंधू-साईना एकमेकींसमोर उभ्या ठाकतील. 

पुरुष एकेरीत दुसऱ्या मानांकित प्रणॉयने रेल्वेच्या शुभंकर डे याचे आव्हान २१-१४, २१-१७ असे सहज परतवून लावले. श्रीकांतनेही दोन गेममध्ये विजय मिळविला. मात्र, त्याला लक्ष्य सेनचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला.

त्याने लक्ष्यचा २१-१६, २१-१८ असा पराभव केला. महिला एकेरीत साईना नेहवाल हिने एअरपोर्ट ॲथॉरिटी संघाच्या अनुरा प्रभुदेसाईचा २१-११, २१-१० असा सहज पराभव केला. सिंधूला मात्र ऋत्विका शिवानीचे आव्हान सहन  करावे लागले. साईनाप्रमाणेच सिंधू एकतर्फी विजय मिळवेल अशीच अपेक्षा होती. मात्र, ऋत्विकाने पहिली गेम जिंकून सर्वांना चकित केले. ऋत्विकाच्या सनसनाटी सुरवातीमुळे सामना रंगणार असे वाटले. मात्र, सिंधूने नंतर ऋत्विकाला फार काही करण्याची संधी दिली नाही. सिंधूने ५० मिनिटे चाललेली लढत १७-२१, २१-१५, २१-११ अशी जिंकली.

श्रीकांतचा संघर्ष
यंदा जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या श्रीकांतला आज सोळा वर्षीय लक्ष्यने कडवे आव्हान दिले. या वर्षी बल्गेरियन स्पर्धा जिंकणाऱ्या लक्ष्यने श्रीकांतविरुद्ध खेळताना सुरेख चपळता दाखवली. पण, त्याचे फटक्‍यांवर नियंत्रण नव्हते. आपल्या काही शॉट्‌सने त्याने श्रीकांतलाही एकवेळ चकित केले. पण, श्रीकांतला हरवण्यासाठी याहून अधिक चांगला खेळ करावा लागेल, याची कल्पना त्याला नक्की आली असेल. दोन्ही गेममध्ये विश्रांतीनंतर श्रीकांतने आपल्या खेळाला वेग दिला आणि आघाडी वाढवीत विजयावर शिक्कामोर्तब केले. 

स्पर्धेच्या दुहेरीतही दिग्गज खेळाडूंचा पगडा राहिला. पुरुष दुहेरीत मनू अत्री-बी सुमीत रेड्डी, सत्विकसाईराज, अश्‍विनी पोनप्पा, प्रणय चोप्रा या अनुभवी खेळाडूंनी आपापल्या साथीदारांसह अंतिम फेरी गाठली.

‘श्रीकांतला आतापर्यंत मी केवळ टीव्हीवरच बघितले. त्याच्याविरुद्ध मी पहिल्यांदाच खेळलो. सामन्यात शंभर टक्‍के देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनुभवी श्रीकांतच्या आक्रमक फटक्‍यापुढे माझे प्रयत्न कमी पडले. पण या सामन्यातून मला खूप काही शिकायला मिळाले. 
- लक्ष्य सेन 

Web Title: sports news badminton competition