साईना, सिंधू, श्रीकांतला अनुकूल ड्रॉ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

मुंबई - जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचा ‘ड्रॉ’ जाहीर झाला असून हा भारताच्या प्रमुख खेळाडूंसाठी खूपच अनुकूल आहे. रिओ ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू, गतउपविजेती साईना नेहवाल, तसेच पुरुष एकेरीतील भारताचे प्रबळ आशास्थान श्रीकांत यांना उपांत्यपूर्व फेरीपर्यंत फारसे आव्हान नसेल.

मुंबई - जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचा ‘ड्रॉ’ जाहीर झाला असून हा भारताच्या प्रमुख खेळाडूंसाठी खूपच अनुकूल आहे. रिओ ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू, गतउपविजेती साईना नेहवाल, तसेच पुरुष एकेरीतील भारताचे प्रबळ आशास्थान श्रीकांत यांना उपांत्यपूर्व फेरीपर्यंत फारसे आव्हान नसेल.

साईनाची उपांत्यपूर्व फेरीत लढत द्वितीय मानांकित सुंग जी ह्यून हिच्याविरुद्ध अपेक्षित आहे. तोपर्यंत तिला कोणतेही खडतर आव्हान नसेल. तिला तसेच सिंधूला पहिल्या फेरीत बाय आहे. सिंधूची दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत ४१ वी असलेल्या किम ह्यो मिनविरुद्ध (कोरिया), तर दुसऱ्या फेरीत तेराव्या मानांकित चेऊंग नयनतारा हिच्याविरुद्ध तिसऱ्या फेरीत लढत अपेक्षित आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिची प्रतिस्पर्धी चीनची सुन यु असू शकेल.

पुरुष एकेरीत आठव्या मानांकित किदांबी श्रीकांतचा उपांत्यपूर्व फेरीपर्यंतचा मार्ग सोपा असेल, असेच वाटत आहे. इंडोनेशियन तसेच ऑस्ट्रेलियन सुपर सीरिज विजेत्या श्रीकांतला रशियाचा सर्गी सिरांत आणि चौदावा मानांकित अँडर्स अँटॉनसेन (डेन्मार्क) फारसे आव्हान देतील, असे वाटत नाही. ही स्पर्धा २१ ऑगस्टपासून ग्लास्गो येथे सुरू होणार आहे. 

भारतीयांच्या लढती
महिला एकेरी ः पी. व्ही. सिंधू - बाय, साईना नेहवाल - बाय, तन्वी लाड वि. च्लोए बिर्च, रितूपर्णा दास - ऐरी मिक्केला. 

पुरुष एकेरी ः किदांबी श्रीकांत वि. सर्गी सिरांत, समीर वर्मा वि. पाब्लो अबियान, साईप्रणित वि. वेई नॅन, अजय जयराम वि. ल्युका व्रॅबेर. 

महिला दुहेरी ः जाक्कमपुडी मेघना - पूर्वषा एस राम वि. एफ्जी मुस्केन्स - सेलेना पिएक, अश्‍विनी पोनप्पा - एन सिक्की रेड्डी वि. रिरीन ॲमेलिया - ॲन्ना चिएंग यिक चेआँग, संजना संतोष - आरती सारा सुनील वि. नताल्या वोयत्सेख - येल्यझावेता झार्का.  पुरुष दुहेरी ः मनू अत्री - सुमीत बी रेड्डी वि. चुएंग एऊ सेऑक - किम ड्यूकयंग. श्‍लोक रामचंद्रन - एम. आर. अर्जुन वि. लियाओ मिन चुन - चेंग हेंग सु, सात्विकराज रानकिकरेड्डी - चिराग शेट्टी - बाय

Web Title: sports news badminton Saina Sindhu Srikanth