साईना, सिंधू दुसऱ्या फेरीत

पीटीआय
बुधवार, 14 जून 2017

जकार्ता - तीन वेळच्या विजेत्या साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी यंदाच्या इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. साईनाने मंगळवारी पहिल्या फेरीत रॅटचेनॉक इन्टॅनॉन हिचे आव्हान १७-२१, २१-१८, २१-१२ असे परतवून लावले. 

सात वर्षांत सानिया प्रथमच जागतिक क्रमवारीतून पहिल्या दहांतून बाहेर पडली आहे. पहिल्या फेरीतही तिला विजयासाठी संघर्ष करावा लागला. दुसऱ्या फेरीत तिची गाठ थायलंडच्याच निटचॉन जिंदापॉल हिच्याशी पडणार आहे.  

स्पर्धेत पहिल्या दिवशी मिश्र दुहेरीत भारताच्या बी. सुमीत रेड्डी-अश्‍विनी पोनप्पा यांना पराभव पत्करावा लागला. त्यांना इंडोनेशियाच्या इरफान फदिला आणि वेनी अँग्राइनी जोडीने १२-२१, ९-२१ असे पराभूत केले. 

साईनाने लढतीला १०-४ अशी चांगली सुरवात केली होती. पण, ब्रेकनंतर तिने आघाडी गमावली. रॅटचनॉक हिने १४-१४ अशी बरोबर साधली आणि नंतर तिने मागे वळून बघितलेच नाही. दुसऱ्या गेमला साईना पुन्हा एकदा १२-७ अशी आघाडीवर होती. या वेळीदेखील रटचनॉक हिने १६-१६ अशी बरोबरी साधली. पण, या वेळी साईनाने जोरकस प्रतिआक्रमण करून दुसरी गेम जिंकली. निर्णायक गेममध्ये सुरवातीपासून आघाडी मिळवत तिने ८-२ अशी सुरवात केली आणि नंतर दमलेल्या प्रतिस्पर्धीस संधीच दिली नाही. 

साईनापाठोपाठ भारताच्या चौथ्या मानांकित पी. व्ही. सिंधू हिनेदेखील पहिल्या फेरीत विजय मिळविला. तिने थायलंडच्या पॉर्नपवी चोचुवाँग हिचा २१-१२, २१-१९ असा पराभव केला. 

दरम्यान, ऑलिंपिक चॅंपियन कॅरोलिना मरिन हिला चीनच्या शेन झियाओझिन हिने पहिल्या फेरीत धक्का दिला. शेन हिने रंगतदार लढतीत मरिनचे आव्हान २१-१२, १०-२१, २२-२० असे मोडून काढले.

Web Title: sports news badmiton saina nehwal P. V. Sindhu