पंकज अडवाणी सतराव्यांदा जागतिक विजेता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

मुंबई - पंकज अडवाणीने पुन्हा एकदा बिलियर्डस्‌ १५० अप प्रकारातील जागतिक विजेतेपद राखले. त्याने इंग्लंडच्या माईक रसेल याचे आव्हान ६-२ असे सहज परतवले. हे त्याचे एकंदरीत सतरावे जागतिक विजेतेपद आहे.

पंकजने पिछाडी भरून काढताना या लढतीत ०-१५५, १५०-१२८, ९२-१५१, १५१-०, १५१-६, १५१-०, १५०-५८, १५०-२१ असा विजय मिळविला. त्याने उपांत्य फेरीत रूपेश शाह याला; तर त्यापूर्वीच्या दोन फेरीत ध्रुव सितवाल आणि ब्रिजेश दमानी यांना हरवले होते.  

माईकने पहिल्या फ्रेममध्ये पंकजला संधीच दिली नाही, पण दुसऱ्या फ्रेममध्ये माफक संधीचाही पंकजने फायदा घेतल्याचे कायम दडपण रसेलवर आले. पंकजने १-२ पिछाडीनंतर सलग तीन फ्रेम जिंकताना केवळ सहा गुणच गमावले. त्याच वेळी निकाल स्पष्ट झाला. पंकजची दोहातील मोहीम संपलेली नाही. आता तो अठराव्या विजेतेपदासाठी प्रयत्न करेल. त्यासाठी त्याचे बिलियर्डस्‌मधील लाँग अप स्पर्धा जिंकण्याचे लक्ष्य असेल.

Web Title: sports news billiards competition