विजेतेपदासह मेवेदरची निवृत्ती

पीटीआय
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

लास वेगास - अव्वल बॉक्‍सर फ्लॉईड मेवेदर याने दहाव्या फेरीत कॉनर मॅकग्रेगॉर याला ‘नॉक आउट’ पंच देत ‘सुपर फाइट’ लढत जिंकली. त्याचा कारकिर्दीमधील सलग ५०वा विजय ठरला. या विशेष लढतीसाठी मेवेदरने दोन वर्षांपूर्वी घेतलेला निवृत्तीचा निर्णय मागे घेतला होता. आयर्लंडच्या या मार्शल आर्टमधील स्टारविरुद्ध खेळताना मेवेदरला कुठलेच कष्ट पडले नाहीत. त्याने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत लढतीवर निर्विवाद वर्चस्व राखले. दहाव्या फेरीत मेवेदरच्या डाव्या हाताच्या ‘हूक्‍स’च्या फटक्‍यांनी मॅकग्रेगॉर पुरता निष्प्रभ झाला आणि रिंगेच्या ‘रोप्स’वर पडला.

लास वेगास - अव्वल बॉक्‍सर फ्लॉईड मेवेदर याने दहाव्या फेरीत कॉनर मॅकग्रेगॉर याला ‘नॉक आउट’ पंच देत ‘सुपर फाइट’ लढत जिंकली. त्याचा कारकिर्दीमधील सलग ५०वा विजय ठरला. या विशेष लढतीसाठी मेवेदरने दोन वर्षांपूर्वी घेतलेला निवृत्तीचा निर्णय मागे घेतला होता. आयर्लंडच्या या मार्शल आर्टमधील स्टारविरुद्ध खेळताना मेवेदरला कुठलेच कष्ट पडले नाहीत. त्याने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत लढतीवर निर्विवाद वर्चस्व राखले. दहाव्या फेरीत मेवेदरच्या डाव्या हाताच्या ‘हूक्‍स’च्या फटक्‍यांनी मॅकग्रेगॉर पुरता निष्प्रभ झाला आणि रिंगेच्या ‘रोप्स’वर पडला. त्या वेळी पंच रॉबर्ट बिर्ड यांनी हस्तक्षेप करून लढत थांबवली आणि मेवेदरला तांत्रिक गुणांवर विजयी घोषित केले. या लढतीनंतर मेवेदरने सलग ५०वा विजय मिळविल्यावर बॉक्‍सिंगमधून कायमस्वरूपी निवृत्त होत असल्याचे जाहीर केले.

Web Title: sports news boxing Floyd Mayweather

टॅग्स