गौरव भिदुरीचे पदक निश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

हॅम्बुर्ग - मनोज कुमार, सुमित संगवान आणि विकास क्रिशन असे अनुभवी बॉक्‍सर पराभूत होत असतानाच ‘वाइल्ड कार्ड’द्वारे प्रवेश मिळालेल्या गौरव भिदुरीने जागतिक बॉक्‍सिंग स्पर्धेची उपांत्य फेरी गाठून भारताचे एक पदक निश्‍चित केले. 

हॅम्बुर्ग - मनोज कुमार, सुमित संगवान आणि विकास क्रिशन असे अनुभवी बॉक्‍सर पराभूत होत असतानाच ‘वाइल्ड कार्ड’द्वारे प्रवेश मिळालेल्या गौरव भिदुरीने जागतिक बॉक्‍सिंग स्पर्धेची उपांत्य फेरी गाठून भारताचे एक पदक निश्‍चित केले. 

जागतिक स्पर्धेत पदक मिळविणारा गौरव आता भारताचा चौथाच बॉक्‍सर ठरेल. त्याने मंगळवारी झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत ट्युनिशियाच्या बिलेल म्हामदी याचा पराभव केला. स्पर्धेच्या ५६ किलो वजनी गटात जज्जेसने विभागून दिलेल्या मतामुळे गौरव विजेता ठरला. जागतिक स्पर्धेच्या पदार्पणात पदक मिळविणारा गौरव भारताचा दुसरा बॉक्‍सर ठरला. यापूर्वी २०११ मध्ये विकास क्रिशनने पदक मिळविले होते. या कामगिरीने गौरव प्रफुल्लित झाला होता. तो म्हणाला, ‘‘मी कमालीचा आनंदी आहे. वाइल्ड कार्ड प्रवेश मिळविल्यानंतर मी पदक विजेता ठरलो. हे सगळे इतक्‍या झटपट घडले की ते स्वीकारायला मला अजून काही वेळ द्यावा लागेल. सगळेच स्वप्नवत वाटत आहे.’’ मला ब्राँझच्याही पुढे जाऊन वरचे पदक मिळविण्याची इच्छा आहे, असे सांगून गौरव म्हणाला, ‘‘जागतिक स्पर्धेतील भारताच्या ब्राँझपदकाचा रंग बदलून इतिहास घडविण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. गेले आठ महिने पाठीच्या दुखापतीचा त्रास सहन करूनही केवळ घेतलेल्या अपार मेहनतीमुळेच मला हे यश साध्य झाले.’’ उपांत्य फेरीत आता त्याची गाठ गुरुवारी (ता. ३१) अमेरिकेच्या ड्युक रॅगनशी पडेल. स्पर्धेत उद्या सुटीचा दिवस आहे.

स्पर्धेत आगेकूच करणारा भारताचा दुसरा पदार्पण करणारा अमित फांगल याला ४९ किलो वजनी गटात पराभवाचा सामना करावा लागला. त्याला उझबेकिस्तानच्या ऑलिंपिक विजेत्या हसनबॉय डुस्मातोवकडून पराभूत झाला.

Web Title: sports news boxing gaurav bhiduri