आनंदची स्वीडलरशी बरोबरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

विक आन झी (नेदरलॅंड्‌स) - भारताचा ग्रॅंडमास्टर विश्‍वनाथन आनंदने टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेतील आठव्या  फेरीत रशियाच्या पीटर स्वीडलरशी बरोबरी राखली. त्यापूर्वी आनंदला सातव्या फेरीत  व्लादिमीर क्रामनिककडून ३६ चालीत पराभव पत्करावा लागला होता. स्वीडलरशी बरोबरी राखून आनंदचे आठव्या फेरीनंतर ४.५ गुण झाले आहेत. त्याला विजेतेपदासाठी आव्हान राखायचे असेल, तर आता उर्वरित पाच फेऱ्यांमधून किमान दोन विजय मिळवावे लागतील. आठव्या फेरीअखेर शखीरयार मामेड्यारोव आणि अनिश गिरी आघाडीवर आहेत.

Web Title: sports news chess competition