सिंधूचा ब्रेक, श्रीकांतला कडवे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

भारताने राष्ट्रकुल क्रीडा बॅडमिंटन स्पर्धेत अपेक्षेनुसार जोरदार सुरवात करताना शेजारील श्रीलंका, तसेच पाकिस्तानला प्रतिकाराची संधी दिली नाही. उद्‌घाटन सोहळ्यात भारतीय पथकाचे नेतृत्व केलेल्या पी. व्ही. सिंधूला ब्रेक देत भारताने हे विजय मिळविले. 

भारताने दोन्ही लढती ५-० जिंकल्या असल्या तरी विजयानंतर भारतीय पूर्ण समाधानी नसतील. किदांबी श्रीकांतला पाकिस्तानच्या मोराद अलीने चांगलेच झुंजवले. त्याने दुसरा गेम जादा गुणांवर नेला. त्यात मोरादला एकही गेम पॉईंट न दिल्याचे समाधान श्रीकांतला लाभले. 

भारताने पाकिस्तानविरुद्ध एकही गेम गमावली नाही, पण श्रीलंकेविरुद्ध हे समाधानही लाभले नाही. प्रणव चोप्रा आणि ऋत्विका गाडे यांनी मिश्र दुहेरीत दुसरी गेम गमावली, तर निर्णायक गेम जिंकण्यासाठी त्यांना जादा गुणांचा आधार घ्यावा लागला. 

भारताच्या दोन्ही संघांनी टेबल टेनिस स्पर्धेच्या साखळीत अव्वल क्रमांक मिळविला. 

पुरुषांनी त्रिनिदाद टोबॅगोला ४-१ आणि उत्तर आयर्लंडला ३-०; तर महिलांनी 
श्रीलंकेला ३-०; तर वेल्सला ३-१ असे हरवले.

Web Title: sports news common wealth games p v sindhu kidambi srikanth